आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Actor Vivek Oberoi Financial Aid To Nagpur's Robotics Center

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागपुरातील रोबोटिक्स सेंटरला विवेक अाेबेराॅयकडून अर्थसाहाय्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - पडत्या काळात नागपूरकरांनी मला आधार दिला. याशिवाय पणजोबापासून आपला परिवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळलेला आहे. संघ विचारांच्या प्रेरणेतून आणि नागपूरकरांशी भावनिक बांधिलकीमुळे या शहरात रोबोटिक्स सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला. आज या सेंटरसंदर्भात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ प्रशासनाशी प्राथमिक स्तरावर चर्चा झाली असल्याची माहिती प्रसिद्ध अभिनेते विवेक ओबेरॉय यांनी साेमवारी दिली.
दहा दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विद्यापीठ आणि विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रोद्योगिकी संस्था (व्हीएनआयटी) यांची बैठक घेऊन रोबोटिक्स सेंटर सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार या सेंटरच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी विद्यापीठाला आर्थिक मदतीची गरज होती. ती मदत करण्याची विवेक ओबेरॉय यांनी तयारी दर्शवली होती. त्यानंतर साेमवारी अाेबेराॅय यांनी नागपूर विद्यापीठाला भेट दिली आणि अधिकाऱ्यांशी प्राथमिक चर्चा केली.
पत्रकार परिषदेत अाेबेराॅय म्हणाले, ‘मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ‘हॅनोव्हर’ येथे गेलो होता. त्या वेळी विज्ञान उद्योगांचा जवळून परिचय झाला. मानवी आयुष्य अधिक सुखकर करण्यासाठी विज्ञानाशी सांगड घालणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे रोबोटिक्स तयार करण्यात जागतिक स्तरावरील नामांकित ‘एबीबी’ कंपनीने भारतात रोबाेटिक्स प्लँट सुरू करण्याची तयारी दर्शवली. परंतु त्यांची प्राथमिक अट मनुष्यबळाची होती. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना रोबोटिक्स सेंटर सुरू करण्याची कल्पना बोलून दाखवली. मुख्यमंत्र्यांनीही ताबडतोब होकार दर्शवला. नागपुरात रोबोटिक्स सेंटरच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात होईल,’ अशी ग्वाही अोबेरॉय यांनी दिली.

मनुष्यबळ तयार करण्याचे आव्हान महाराष्ट्र पेलणार
नागपूर शहर मोठ्या झपाट्याने विकसित होत आहे. एबीबी ही रोबोटिक्स कंपनी महाराष्ट्रात प्लँट सुरू करण्यास तयार आहे. परंतु हे प्लँट चालवण्यासाठी मनुष्यबळाची गरज आहे. ही मनुष्यबळाची गरज भागवण्यासाठी नागपुरात रोबोटिक्स सेंटर सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे रोबोटिक्सचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ताबडतोब रोजगार मिळेल, असा विश्वास अाेबेराॅय यांनी व्यक्त केला.