आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेम, जिज्ञासेतून फुलवले ‘अ‍ॅडेनियम’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - उद्यानविद्या शाखेतील कुठलाही अभ्यासक्रम पूर्ण केलेला नसताना केवळ फुलांबद्दलचे प्रेम आणि जिज्ञासेच्या बळावर रामेश्वर पावडे यांनी घराच्या छतावर अ‍ॅडेनियम वाळवंटी गुलाब (डेझर्ट रोझ) विकसित केले. मागील पाच वर्षांपासून ते याची लागवड करत असून, कलम बांधणी व रोपट्यांवरील विविध प्रक्रियेच्या माध्यमातून त्यांनी 50 आकर्षक रंगांत अ‍ॅडेनियमची रोपटी बनवली आहेत. शिवाजी महाविद्यालयाच्या बगीच्यात ते 1990 मध्ये नोकरीला लागले. तेव्हापासून झाडा-फुलांबद्दल प्रेम निर्माण झाले. वनस्पतिशास्त्रात पारंगत प्राचार्य डॉ. व. रा. घुरडे यांच्या मार्गदर्शनामुळे या क्षेत्रात रुची निर्माण झाली. यातूनच अ‍ॅडेनियमचे नवनवीन झाडे विकसित करण्याचे कौशल्य प्राप्त झाल्याचे रामेश्वर पावडे सांगतात. सुरुवातीला सिझनल व जरबेराची लागवड केली. त्यानंतर अ‍ॅडेनियम रोपटे विकसित केले. घरीच सर्व प्रक्रिया करून याची लागवड करीत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय गार्डनिंगमध्ये क्षेत्रात आवड असणार्‍यांनाही पावडे मार्गदर्शन करीत आहेत.
असा झाला अ‍ॅडेनियम विकसित : सुरुवातीला डायन्यस, पिटोनिया, हार्बेना, कॅलेडुला, पँझी, रूट बेकिया व अ‍ॅस्टर आदी मोसमी फूलझाडांची पावडे यांनी लागवड केली. टिश्यू कल्चरच्या साहाय्याने परागीकरण करून जरबेराची विविध रोपटी विकसित केली. त्यानंतर अ‍ॅडेनियमची लागवड करून त्यावर लक्ष केंद्रित केले. विविध ऋतूंमध्ये अ‍ॅडेनियमची काळजी घेऊन रोपटे कसे टिकवता येणार, यावर त्यांनी काम केले. पावडे यांच्या छतावर सध्या 300 रोपटी आहेत.
घरीच प्रक्रिया करून लागवड
विटांचा चुरा, मुरमाड माती, सेंद्रिय खताचा वापर करून अ‍ॅडेनियमची लागवड करण्यात येते. घरीच सर्व प्रक्रिया करून रोपट्यांची लागवड करण्यात येते. कुंडीला छिद्र पाडून त्यामध्ये दगड, रेती, मातीचे मिश्रण करून अ‍ॅडेनियमची लागवड करण्यात येते. लागवडीसाठी पाण्याचा अत्यंत कमी वापर होतो.
देशभरातून केले संकलन
चेन्नई, गोखपूर, जयपूर, मुंबई व पुणे येथून रोपांचे संकलन करून अ‍ॅडेनियम विकसित केले. घराच्या छतावरच या झाडाचे रोपटे विकसित केले आहे. थायलंड व तैवान येथे अ‍ॅडेनियमला विशेष पसंती आहे.
रामेश्वर पावडे, कर्मचारी