आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतांची वाणी अन् पावसाचे पाणी जगण्यासाठी आवश्यक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- संतांची वाणी अन् पावसाचे पाणीच जगण्यासाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन दर्शनवल्लभ विजयजी महाराजांनी केले. आदिनाथ जैन श्वेतांबर मंदिरात चतुर्मासनिमित्त आयोजित प्रवचनात ते बोलत होते. मंदिरातर्फे रविवारी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

दर्शनवल्लभ विजयजी महाराज म्हणाले की, पावसाच्या वेळी जर शेतकर्‍याने आळस केला, तर त्याला वर्षभर पश्चात्ताप करावा लागतो, तसेच देवाची वाणी आपल्याला संतांच्या वाणीतून मिळते, जर ते ऐकण्याचा आळस केला, तर अनेक जन्म पश्चात्ताप करावा लागतो. आयुष्य एकदाच मिळते त्यामुळे ते व्यर्थ घालवू नये. आपल्याला मिळालेल्या आयुष्याचा योग्य वापर करणे आपले कर्तृव्य आहे. आपल्याला मनुष्याचा जन्म मिळणे ही बहुमोल गोष्ट आहे. मनुष्याच्या शरीराला अन्नापासून शक्ती मिळते, तर त्याच्या आत्म्याची मुक्ती संतांच्या अमृतवाणीतून होत असते.

शोभायात्रा ठरली आकर्षण
सकाळी नवीन जैन मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली. सिटी कोतवाली, जुना कपडा बाजारमार्गे जुन्या जैन मंदिरात शोभायात्रा पोहोचली. सहा रथांमध्ये ठेवलेले गुरूंचे फोटो सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. मुंबईहून आलेले ढोल पथक आणि ओडिशाहून आलेले शंखवादकामुळे शोभायात्रेत सहभागी भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. चतुर्मासामध्ये 82 दिवसांच्या धर्मचक्र तपाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारपासून या तपाची सुरुवात होणार आहे. यावेळी आदिनाथ जैन श्वेतांबर मंदिराचे प्रमुख रमेशचंद्र गोलेच्छा, महेंद्र देडिया, हेमेंद्र शहा, किशोरचंद जालोरी उपस्थित होते.