आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Advani Meets Mohan Bhagwat In Nagpur Rss Headquarter

अडवाणी संघदरबारी, मोदीविरोध कमी करण्‍यासाठी सरसंघचालकांनी काढली समजूत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- भारतीय जनता पार्टीमध्‍ये लालकृष्‍ण्‍ा अडवाणी आणि नरेंद्र मोदी यांच्‍यात शीतयुद्ध सुरुच आहे. मोदीच्‍या ब्‍लूप्रिंटवर अडवाणींनी आक्षेप घेतल्‍यानंतर आज अडवाणी नागपुरात संघ मुख्‍यालयात दाखल झाले. सरसंघचालक मोहन भागवत यांच्‍यासह संघाच्‍या वरिष्‍ठ नेत्‍यांसोबत अडवाणींनी चर्चा केली. मोदींच्‍या नियुक्तीवरुन नाराज झालेल्‍या अडवणींची सरसंघचालकांनी समजूत काढली होती. त्‍यानंतर दुस-या फेरीच्‍या चर्चेसाठी अडवाणी संघ दरबारी दाखल झाले. या बैठकीतही केंद्रस्‍थानी मोदीच होते. मोदीविरोध कमी करण्‍यासाठी भागवत यांनी अडवाणींची समजूत काढण्‍याची चर्चा आहे.

सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, अडवाणी यांचा नागपूर दौरा विशेष कारणासाठी आहे. अडवाणींचा मोदीविरोध पाहता सरसंघचालक त्‍यांच्‍याशी पुन्‍हा चर्चा करणार आहेत. मोदींच्‍या नियुक्तीनंतर अडवाणींनी भाजपमधील तीन समित्‍यांच्‍या अध्‍यक्षपदाचा राजीनामा दिला होता. परंतु, भागवत यांनी दूरध्‍वनीवरुन अडवाणींची समजूत काढली होती. त्‍यानंतर त्‍यांनी राजीनामा मागे घेतला होता. त्‍याचवेळी झालेल्‍या चर्चेत अडवाणींचा नागपूर दौरा निश्चित झाला होता. त्‍यानुसार आज अडवाणी संघ मुख्‍यालयात दाखल झाले. पक्ष संघटना, आगामी निवडणुका, भाजपची भावी दिशा तसेच नरेंद्र मोदी या मुद्यांवर भागवत आणि अडवाणी यांच्‍यात चर्चा झाल्‍याची माहिती आहे. अडवाणींचा मोदीविरोध कमी करण्‍यासाठी ही भेट असल्‍याची चर्चा आहे. अडवाणी आज दिवसभर संघ मुख्‍यालयात राहणार असून उद्या भाजपचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष राजनाथ सिंह हे सरसंघचालकांची भेट घेणार आहेत. ज्‍येष्‍ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनीही नुकतीच सरसंघचालकांची भेट घेतली होती.