आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूरात महिला वकीलाला स्कूलबस चिरडले, वाहतूक पोलिस नसल्याने झाला अपघात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- नागपूरमधील रवीनगरमध्ये एका खासगी स्कूलबसने महिला वकीलाला चिरडल्याची घटना घडली आहे. अॅड.विजया विवेक बोडे (48) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी बस चालक ईश्वर निखर (50) याला अटक केले आहे. रवीनगर चौकात वाहतूक पोलिस नसल्याने वारंवार असे अपघात होत असतात, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

म‍िळालेल्या माहितीनुसार, अॅड. विजया बोडे या कामानिमित्त सोमवारी दुपारी दुचाकीने लॉ कॉलेज चौकातून रवीनगर चौकात जात असताना तुली पब्लिक स्कूलच्या बसने त्यांना चिरडले.
अॅड. विजया यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. बसचालक ईश्वर निखर याने विश्वदीप नगर , कस्तूरबा नगरात बस सोडून स्वत: पोलिसांना शरण गेला. अंबाझरी पोलिसांनी पंचनामा करून अॅड. विजया यांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. अंबाझरी पोलिस पुढील चौकशी करत आहेत.

मृत विजया या विवेक बोडे यांच्या पत्नी होत. विवेक बोडे हे मेडिकल कॉलेज व रूग्णालयाच्या डी.एस. ऑफिसमध्ये वरिष्ठ सहायक पदावर कार्यरत आहेत.