आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यावर पुन्हा भारनियमनाचे संकट ? चंद्रपूर वीज केंद्रातील चार संच बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - राज्यावर पुन्हा वीज भारनियमनाचे संकट येऊन ठेपले आहे. चंद्रपूर औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील सातपैकी तीनच संच सुरू असल्याने राज्यातील नागरिकांना पुन्हा विजेचे झटके आणि उन्हाचे चटके सहन करण्याची वेळ आली आहे.

उन्हाळ्यात विजेची मागणी नेहमीच वाढते. कारण घरोघरी पंखे, कुलर, टीव्ही, फ्रिज आदी इलेक्ट्राॅनिक उपकरणे २४ तास सुरू असतात. २,३४० मेगावॅट वीज क्षमता असलेल्या चंद्रपूर वीज निर्मिती केंद्रातून रविवार दुपार पर्यत ७०५ मेगावॅट वीज निर्मिती होत होती. यात १, ६३५ मेगावॅटची कमतरता होती. साधारणत: उन्हाळ्यात विजेची वाढती मागणी लक्षात घेता चंद्रपूर वीज निर्मिती केंद्रातील सर्व संच पूर्ण क्षमतेने चालवले जातात.
मात्र, या वेळी संच क्र. १ प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगी अभावी बंद आहे. तर संच क्र. २ देखभाल-दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. एअर हिटींगची समस्या उद्भवल्याने संच क्र. ५ तर संच क्र. ६ काही तांत्रिक कारणांमुळे बंद ठेवण्यात आलाय. वीज केंद्राचे अधिकारी मात्र बिघाड वेगाने दुरूस्त करून वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे सांगत आहेत. मात्र अजूनही वीज पुरवठा सुरळीत होऊ शकलेला नाही.