आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनास वेग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ - वेगळ्या विदर्भाचे आंदोलन पुन्हा जोर धरू लागले आहे. विदर्भ जॉइंट अँक्शन कमिटीने गुरुवारी विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या पैनगंगा नदीच्या तीरावर वेगळ्या विदर्भाचे फलक झळकावले. या वेळी उपस्थित विदर्भवाद्यांनी वेगळ्या विदर्भाची लढाई आणखी तीव्र करण्याची घोषणा केली.

तेलंगणा राज्य निर्मितीचा मार्ग मोकळा झाल्याने विदर्भाची मागणीही जोर धरू लागली आहे. जवळपास तीस संघटनांचा समावेश असलेल्या विदर्भ जाँइंट अँक्शन कमिटीने विदर्भात सर्वदूर आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. आज दुपारी कमिटी कमिटीचे अध्यक्ष दीपक निलावार, माजी आमदार वामनराव चटप, राजू जयस्वाल, राजू नजरधने इत्यादी विदर्भवादी नेत्यांच्या उपस्थितीत उमरखेड तालुक्यातील पैनंगगा नदीच्या तीरावर वेगळ्या विदर्भाचे फलक झळकावण्यात आले. या वेळी वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी नारेबाजीही करण्यात आली. विदर्भाची मागणी खूप जुनी आहे. संघर्षाशिवाय ती पूर्ण होणार नाही. विदर्भातील दहा खासदार व 62 आमदारांना पत्र पाठवूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही, त्याबद्दल या वेळी खेद व्यक्त करण्यात आला.

आंदोलनात विदर्भातील सर्व जनतेने सहभागी होण्याचे आवाहन दीपक निलावार यांनी केले. नक्षलवाद, कुपोषण ही विदर्भाला शासनाची देण आहे. येथील वीज, कोळसा , मॅगनिजची लूट सुरू असून वेगळा विदर्भ घेतल्याशिवाय विदर्भाचा विकास शक्य नाही, असे प्रतिपादन वामनराव चटप यांनी केले.


नागपूर कराराची होळी करणार
येत्या 28 सप्टेंबर 2013 रोजी नागपूर कराराला सात वर्षे पूर्ण होत आहे. या दिवशी हा करार संपल्याचा ठराव घेऊन त्याची होळी करण्यात येईल. एवढेच नव्हे तर विदर्भातील महाराष्ट्र लिहिलेल्या प्रत्येक ठिकाणी ते खोडून विदर्भ लिहिणार असल्याचे या वेळी नेत्यांनी सांगितले.