आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Agitation Out Side Of Court In Nagpur Demand For The Excution Of Hanging To Offender

आरोपीला फाशी देण्‍यावरून नागपुरात कोर्टाबाहेर जमावाची दगडफेक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - महिला व युवतींची छेड काढून परिसरात प्रचंड दहशत माजविणा-या आरोपीला मागील वर्षी ठेचून मारणा-या जमावाने सोमवारी नागपूर न्यायालयाबाहेर दगडफेक करून आरोपीच्या भावालाही फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. या हल्ल्यात पोलिसांच्या गाडीचे नुकसान झाले.

वसंतराव नाईक झोपडपट्टीतील इकबाल शेख व अक्रम ऊर्फ भु-या शेख या दोन भावांची शहरात प्रचंड दहशत होती. महिला, युवतींचीही ते नेहमी छेड काढायचे. या प्रकरणी पोलिसात तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याने संतापलेल्या जमावाने 9 ऑक्टोबर 2012 रोजी झोपडपट्टीवर जुगार अड्ड्यावर हल्लाबोल करत इकबाल शेखची ठेचून हत्या केली. मात्र, जमावाच्या तावडीतून सुटका करून घेत अक्रम जीव वाचवण्यासाठी पोलिसांना शरण गेला होता.
दरम्यान, एका खुनाच्या गुन्ह्यात भु-याला सोमवारी नागपूरच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्या वेळी न्यायालयाबाहेर झोपडपट्टीतील असंख्य नागरिकांनी गर्दी केली होती. त्यांनी न्यायालयात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांनी त्यांना बाहेरच अडवले. या प्रकारामुळे संतापलेल्या जमावाने ‘भु-याला फाशी द्या’ अशी मागणी करत पोलिस व न्यायालय परिसरात तुफान दगडफेक सुरू केली. यात पोलिसांच्या एका जीपचे नुकसान झाले. दरम्यान, पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेत जमावाला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.