आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Agriculture Land On Devendra Fadanvis With Mother, Brother

फडणवीसांसह आई, भावाच्या नावे शेती; भाऊ आशिषला 18 हजारांची दुष्काळी मदत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - दुष्काळ, गारपीटग्रस्त शेतकरी म्हणून शासनाकडून मिळालेली मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या कुटुंबीयांनी शासनाला परत केली आहे. शासनाची मदत इतर गरजू शेतक-यांना मिळावी, या अपेक्षेसह फडणवीस कुटुंबीयांनी ही रक्कम १२ मार्च राेजी परत केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात मूल व कोसंबी येथे मुख्यमंत्री देवेंद्र, त्यांचे बंधू आशिष आणि आई सरिताताई अशा तिघांच्या संयुक्त नावे ३० ते ३५ एकर शेती आहे. मात्र, शेतीचे बँक खाते आशिष यांच्या नावे आहे. आशिष यांच्या खात्यात मदतीचे १८,४५० रुपये जमा झाले, तर मूल आणि करवन येथे मुख्यमंत्र्यांचे काका श्रीकृष्ण ऊर्फ बाळासाहेब फडणवीस यांची ४० एकर शेती आहे. त्यांनाही १३,५०० रुपये मदत चंद्रपूर जिल्हा बँकेच्या मूल शाखेत ४ फेब्रुवारी रोजी जमा झाली होती.
पुण्यात राहणारे श्रीकृष्ण फडणवीस यांना मूल येथे आल्यावर हे कळले. दोघांनीही ती रक्कम परत करण्यासाठी मूलच्या तहसीलदारांशी संपर्क साधून तेवढ्या रकमेचे चेक दिले.

गरजूंना लाभ व्हावा
आमची आर्थिक स्थिती चांगली आहे. मदत खात्यात जमा झाल्याचे कळताच ती न स्वीकारण्याचा निर्णय घेतला. गरजू शेतक-यांना या मदतीचा लाभ व्हावा, अशी आमची प्रामाणिक भावना आहे.
प्रसेनजित फडणवीस, मुख्यमंत्र्यांचे चुलतबंधू

जमा झाल्यास परत करणार
मदतीबाबत माहिती नाही. जमा झाल्यास आम्हीही परत करू. चंद्रपूरच्या शेतक-यांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. त्या सर्वांनाच मदत मिळायला हवी. अद्याप किती जणांना मिळाली ते माहिती नाही.
शोभाताई फडणवीस, मुख्यमंत्र्यांच्या काकू

पुढे वाचा... चव्हाणांनीही परत केले हाेते