आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajit Pawar Critics On Manikrao Thakre & Cm Chavan

काँग्रेसने सर्व जागा लढवाव्यात, आमचे आम्ही बघून घेऊ; अजित पवारांचा इशारा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- 'काँग्रेसची राज्यात पक्षीय व संघटना पातळीवर ताकद खरोखरच वाढली असेल तर त्यांनी खुशाल सर्वच्या सर्व 48 जागा लढवाव्यात, आमचे आम्ही बघून घेऊ', असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेसला दिला. अजित पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.
'सरकारला दिवसेंदिवस जास्त लकवा भरायला लागला आहे, असे सांगत अजित पवारांनी चव्हाण यांच्या संथ कारभारावर टीकास्त्र सोडले. याआधी अजित पवारांचे काका आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी राज्य सरकारच्या प्रमुखांना लकवा भरलाय काय? अशी टीका केली होती.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकसभा जागा वाटपाच्या 29-19 फॉर्म्यूल्याबाबत आग्रही असल्याले माणिकराव ठाकरे यांचे नाव न घेता अजित पवार म्हणाले, एका जिल्हा परिषद आमच्याकडून हिसकावून घेतली तर लोकसभेच्या जागांबाबत बोलायचे मग चार राज्यातील पराभव झाल्यानंतर काय राज्यातील सर्व जागा निवडून आणणार आहात काय? आणि जर काँग्रेस पक्षाची संघटना पातळीवर ताकद वाढली असेल त्यांनी खुशाल सर्वच्या सर्व 48 जागा लढवाव्यात आणि जिंकाव्यात. आम्ही त्यांचे अभिनंदन करू. जर तुम्हाला तशी खात्री असेल तर खुशाल सर्व जागा लढा, आमचे आम्ही बघून घेऊ, असे अजित पवारांनी माणिकरावांवर तोफ डाकली आहे.