आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘तुम्हाला विकास कामे दिसत नाहीत?’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोंदिया - दुष्काळग्रस्तांविषयी वादग्रस्त वक्तव्य करून नंतर ‘पापक्षालन’ करणार्‍या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शनिवारी पुन्हा जीभ घसरली. ‘अरे ७७७, तुम्हाला झालेली कामे दिसत नाही काय?,’ असे वक्तव्य करून त्यांनी शिवीगाळ करत विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला. तिरोडा (जि. गोंदिया) येथील धापेवाडा उपसा सिंचन योजनेच्या जलपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.

शुक्रवारी शिवसैनिकांनी मुंबईसह राज्यभर भ्रष्ट मंत्र्यांच्या पुतळ््याचे दहन केले.हा विरोधकांचा स्टंट असल्याची टीका अजित पवारांनी या वेळी केली. ते म्हणाले की, ‘मध्य प्रदेशात भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या मंत्र्यांना निवडणुकीत पराभूत व्हावे लागले. त्यामुळे येथील मंत्र्यांची प्रतिमा मलिन करून जनतेची दिशाभूल करण्याचे विरोधकांचे प्रयत्न सुरू आहेत. पंधरा वर्षांपासून सत्तेत नसल्यामुळे पाण्यावाचून तडफडणार्‍या माशासारखी विरोधकांची स्थिती झाली आहे. सरकार चालविणे येर्‍यागबाळ्याचे काम नाही. एकदा निवडून आल्यानंतर पाच वर्षे स्थिर सरकार द्यायचे असते. या लोकांनी 45 दिवसांतच सरकार गुंडाळले,’ अशा शब्दात पवार यांनी आम आदमी पार्टीवर टीका केली.