आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajit Pawar News In Marathi, Assembly Election, Divya Marathi

विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार, तटकरेंना कोण वाचवणार?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - सिंचन घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या चौकशीची परवानगी राज्य शासनाकडून नाकारली जाण्याचीच शक्यता असली, तरी विधानसभा निवडणुकीनंतर या दोन्ही नेत्यांना कोण वाचवणार, असा इशारा भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी शनिवारी नागपुरात बोलताना दिला.

सिंचन घोटाळ्यावरील तक्रारीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या नेत्यांची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाला परवानगी मािगतली आहे. याकडे लक्ष वेधले असता भंडारी म्हणाले की, राज्यात आघाडीचे सरकार आहे. राज्यपालही त्यांचेच आहेत. त्यामुळे चौकशीला परवानगी िमळण्याची शक्यता िदसत नाही. मात्र, दोन महिन्यांनंतर राज्यात िवधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या नेत्यांना नंतर कोण वाचवणार, असा इशाराही त्यांनी िदला. राज्यातील जनताच आघाडीवर संतापली आहे. त्यामुळेच पंतप्रधानांच्या उपस्थितीतील कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्र्यांना लोकांचा िवरोध होत आहे, असा दावा करून भंडारी म्हणाले की, लोकांचा िवरोध असला, तरी आघाडीच्या नेत्यांनी पंतप्रधानांचा मान राखण्यासाठी प्रोटोकॉल पाळणे गरजेचे होते.

आता जनताच त्यांना उत्तर देईल, असेही ते म्हणाले.
राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांचे जाहीरनामे तयार करण्याची योजना भाजपने आखली आहे. त्यासाठी मतदारसंघनिहाय मुद्द्यांचा आढावा घेण्यासाठी माधव भंडारी हे सध्या िवदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी नागपुरात पूर्व िवदर्भातील मतदारसंघांची बैठक आयोिजत करण्यात आली होती. िशवसेनेकडील मतदारसंघांसाठीही भाजप स्वत:चा जाहीरनामा तयार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.