आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला शहरातील ‘एटीएम’ची सुरक्षादारे कमकुवत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- केव्हाही, कोठूनही पैसे मिळण्यासाठी एटीएम मशीनचा शोध लागला. क्रेडिट-डेबिट कार्ड आणि पिन नंबरच्या साहाय्याने खात्यातील पैसे काढता येऊ लागले. या ‘एटीएम’ मशीनच्या सुरक्षेबाबत सुरुवातीला काळजी घेण्यात आली. मात्र, ‘दिव्य मराठी’च्या चमूने शहरातील 32 एटीएमला भेटी देऊन केलेल्या पाहणीत ‘एटीएम’मधून पैसे काढणे आता सुरक्षित राहिलेले नसल्याचे दिसून आले. कुणीही या दरवाजा ढकला आणि थेट आतमध्ये जा, असा खुला प्रवेश एटीएम केद्रांवर झाला आहे.

असे हवे..
‘एटीएम’चे दार उघडण्यासाठी दाराजवळ बाहेरच्या बाजूने क्रेडिट-डेबिट कार्ड स्वॅप करण्यासाठी एक छोटीशी खिडकी असते. यामध्ये कार्ड स्वॅप केल्यानंतरच दार उघडते. खातेदार आत गेल्यानंतर दार अँटोमॅटिक लॉक होते. ‘एटीएम’ मशीन हाताळल्यानंतर बाहेर पडण्यासाठी दाराजवळ एक मोठे बटन असते. हे बटन दाबल्यानंतरच दार उघडते, तोपर्यंत बाहेरील व्यक्ती आतमध्ये येऊ शकत नाही. गोपनीय असलेला पिन नंबर टाकताना, पैसे काढताना कोणी अनोळखी व्यक्ती आतमध्ये येऊ नये, यासाठी ही व्यवस्था करण्यात येते.

सुरक्षेची ऐशीतैशी..
‘दिव्य मराठी’च्या चमूने शहरातील विविध भागांत केलेल्या पाहणीत एटीएममधून पैसे काढण्याची प्रक्रिया अतिशय असुरक्षित असल्याचे आढळून आले. दिव्य मराठीच्या चमूने शहरातील विविध भागांतील 15 एटीएम प्रत्यक्ष हाताळून पाहल्या. यावेळी कार्ड स्वॅप करून दार उघडण्याच्या यंत्रणेचा पुरता बोजवारा उडाल्याचे दिसून आले. दार ढकलूनच आतमध्ये प्रवेश करावा लागत असे तसेच दार अँटोमॅटिक लॉक होत नसे. त्यामुळे बटन दाबून बाहेर येण्याचा प्रश्नच नव्हता. दार लॉक होत नसल्याने एक खातेदार आतमध्ये एटीएम हाताळत असतानाही दुसरा खातेदार थेट आतमध्ये येत असल्याचे दिसून आले. दोन ठिकाणची एटीएमची दारे कार्ड टाकताच लॉक होण्याचे प्रकार घडले.

एक वॉच..
13 एटीएमवर सुरक्षा रक्षक
19 एटीएमवरील सुरक्षा रक्षक गायब..

सुरक्षा रक्षकांची नियुक्ती
पूर्वी ‘एटीएम’ला मॅग्नेटिक डोअरप्रणाली लावण्यात आली. मात्र, कालांतराने या प्रणालीमध्ये बिघाड झाला. त्यामुळे सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात आली. सुरक्षा रक्षकामुळे मॅग्नेटिक डोअरप्रणालीची गरज नाही.
-राजन सोनटक्के, व्यवस्थापक, भारतीय स्टेट बॅँक शाखा.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया
बॅँकांनी खातेदारांच्या सोयीसाठी असलेली ‘एटीएम’ यंत्रणाच असुरक्षित असल्याचे वास्तव ‘दिव्य मराठी’ने केलेल्या पाहणीत समोर आले आहे. ‘एटीएम’मधून पैसे काढताना खातेदारांच्या सुरक्षेचे धिंडवडेच निघतात. ‘एटीएम’मध्ये प्रवेश कारण्यापासून ते बाहेर पडेपर्यंत खातेदाराला सुरक्षेची शाश्वती नसल्याचेही दिसून आले.

पंजाब नॅशनल बॅँक
पंजाब नॅशनल बॅँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय, आयडीबीआय बॅँकेच्या ‘एटीएम’चे दार उघडण्यासाठी ‘स्वॅप कार्ड’प्रणाली लावण्यात आलेली नाही. दारावर केवळ बाहेरून ‘पूल आणि आतून ‘पूल’ असे लिहिले होते. दार उघडण्यासाठीची ‘स्वॅप कार्ड’प्रणाली केवळ राष्ट्रीयीकृत बॅँकांच्या एटीएममध्ये आहे.

आयसीआयसीआय बँक
प्रत्येक ‘एटीएम’साठी सुरक्षा रक्षक असणे अपेक्षित आहे. मात्र, ‘दिव्य मराठी’ने केलेल्या पाहणीत केवळ भारतीय स्टेट बॅँक (डाबरीरोड-1), एचडीएफसी बॅँक ( सेठी हाइट्स आणि दक्षतानगर कॉम्प्लेक्स ) आणि आयसीआयसीआय बँकेच्या (दक्षतानगर कॉम्प्लेक्स) एटीएमध्येच सुरक्षा रक्षक असल्याचे आढळून आले.

आओ जाओ अब घर तुम्हारा.. शहरातील एटीएमचे दरवाजे सर्वांसाठी आहेत खुले, मॅग्नेटिक डोअर सिस्टिम केवळ नावालाच

शटर डाउन..
सेंट्रल बॅँक ऑफ इंडियाच्या कौलखेड येथील एटीएमची पाहणी केली गेली. ‘एटीएम’चे अर्र्धेअधिक शटर लावले होते. परिसरात चौकशी केली असता सकाळपासूनच बंद असल्याचे सांगण्यात आले. एटीएम बंद असल्यामुळे अनेक ग्राहक परत गेले. या एटीएमवर सुरक्षा रक्षकही नव्हता.

मॅग्नेटिक डोअर नादुरुस्त
बहुतांश बँकांच्या एटीएममध्ये मॅग्नेटिक डोअर सिस्टिम नादुरुस्त आढळून आली. मोठा खर्च करून एटीएमच्या दरवाजाच्या सुरक्षेसाठी यंत्रणा उभी केली. मात्र, त्याचा योग्य वापर होताना दिसत नाही. बँकाही याबाबत फारसे गांभीर्याने पाहत नाही आणि ग्राहकही तक्रार करत नाही, असे चित्र शहरातील एटीएमवर आहे.

> बँकेतील खातेधारकांच्या सुरक्षेचे धिंडवडे
>बहुतांश एटीएमवर सुरक्षा रक्षकांच्या नियुक्तीची गरज
>सोयी-सुविधांचाही अभाव
>अँक्शन प्लॅनची गरज