आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात ‘ग्रीन सिटी’ अभियान, , ‘दिव्य मराठी’चा दहा हजार वृक्षारोपणाचा संकल्प

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - देशातील सर्वांत मोठय़ा भास्कर समूहाचे दैनिक ‘दिव्य मराठी’ अकोल्यातून लवकरच सुरू होणार आहे. समूहाच्या सामाजिक अभियानांतर्गत शहरात ग्रीन सिटी अभियान सुरू केले आहे. या अभियानाच्या अंतर्गत पर्यावरण संरक्षणासाठी पर्यावरण वाहनाचे लोकार्पण सोमवारी (24 जून) करण्यात आले. या उपक्रमांतर्गत शहरात येत्या दीड महिन्यात दहा हजार वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे.

पर्यावरण वाहनाचे लोकार्पण वन विभागाचे उपवनसंरक्षक विजय गोडबोले यांनी केले. युनिट हेड संजय यादव अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी इव्हेंटचे सहायक व्यवस्थापक अर्शद मिर्झा, समन्वयक विठ्ठल काकडे आदी उपस्थित होते.