आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडियन राउंडमध्ये अक्षय टेकाडेला अव्वल स्थान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - भारतीय महावदि्यालयाच्या अक्षय टेकाडेने १९ वर्षांखालील मुलांच्या जिल्हास्तरीय धनुर्वदि्या स्पर्धेत ७२० पैकी सर्वाधिक गुण संपादन करून इंडियन राउंड प्रकारात विजेतेपद पटकावले. विनायक महावदि्यालयाच्या अर्जुन पसबोरेने द्वितीय स्थानावर ताबा मिळवला.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजति आणि जिल्हा धनुर्वदि्या संघटनेच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या या स्पर्धेत शविाजी विज्ञानच्या शविम सोळंकेने इंडियन राउंडमध्ये तृतीय क्रमांक मिळवला. पोदार इंटरनॅशनलच्या सय्याम गाडेने चौथा क्रमांक मिळवला.
मुलांच्या फिटा राऊंड प्रकारात भारतीय महावदि्यालयाच्या आलेख वानखडेने बाजी मारली. फिटा राउंड प्रकारात ५० मी., ४० मी., ३० मी. आणि २० या चार अंतरांचा समावेश असतो. प्रत्येक अंतरासाठी एकूण ३६० गुण असतात. अशाप्रकारे चारही प्रकारात १४४० पैकी जो धनुर्धर सर्वाधिक गुण मिळवेल, त्याला प्रथम क्रमांक मिळत असतो. विनायक वदि्यालयाच्या श्रेयस ढवरेने द्वितीय आणि रामकृष्ण वदि्यालयाच्या अािलश खेडकरने तृतीय क्रमांक अर्जति केला. मुलींच्या १९ वर्षांखालील गटात इंडियन राउंड प्रकारात पोदार स्कूलच्या तेजश्री राऊतने बाजी मारली, तर फिटा राउंड प्रकारात ब्रजलाल बियाणी महावदि्यालयाच्या पूर्वा पल्लविालने
अजिंक्यपद पटकावले.
१४ वर्षांखालील मुलींच्या गटात अश्विनीचे यश
१४ वर्षांखालील मुलींच्या ग्रामीण गटात इंडियन राऊंडमध्ये नांदगाव हायस्कूलच्या अश्विनी कोल्हेने अचूक लक्ष्यभेद करून सोनेरी पदक जिंकले. तिची सहकारी साक्षी तोटेने रौप्य तर वाय. ई. एस.नांदगावच्या वैष्णवी निचाडेने कांस्यपदकावर ताबा मिळवला. ज्ञानेश्वरी कडूने चौथा क्रमांक पटकावला.
१७ वर्षांखालील ग्रामीण मुलींमध्ये निकिता सर्वोत्तम
नांदगाव हायस्कूलच्या निकिता थोरातने सर्वोत्तम धनुर्धराचा मान पटकावला. निकिता चव्हाणने दुसरा, साक्षी शिरभातेने तिसरा क्रमांक अर्जति केला. फिटा राउंडमध्ये रुक्मिणी बाबरेकरने सुवर्णपदक जिंकले. आयपीएसची आयुषा लढ्ढाने रौप्यपदक हस्तगत केले.
ग्रामीण गटात सुमेध मोहोड अजिंक्य
१४ वर्षांखालील मुलांच्या इंडियन राउंड ग्रामीण गटात गुरुकुल पब्लिक स्कूलच्या सुमेध मोहोडने अजिंक्यपद पटकावले. नांदगाव हायस्कूलच्या यश भुसेने द्वितीय स्थान अर्जति केले. याच शाळेच्या ऋतिक सोळंकेने तृतीय स्थान मिळवले. वाय.ई.एस. हायस्कूल नांदगावच्या नीलेश चव्हाणला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
ग्रामीण मुलांमध्ये घनश्याम विजेता
१७ वर्षांखालील ग्रामीण मुलांमध्ये नांदगाव हायस्कूलच्या घनश्याम चौधरीने इंडियन राउंड प्रकारात विजेतेपद पटकावले. कल्पेश दैतला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, तर हृषिकेश चांदूरकरने तिसरा क्रमांक मिळवला. प्रज्वल पोफळेला चौथा क्रमांक मिळाला. विजेत्या खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.