आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप आमदारांचे आज संघ दर्शन, सर्व आमदार डॉ. हेडगेवार स्मृतिस्थळाला भेट देणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - निवडणूक काळात हुकलेला भाजप आमदारांचा संघ दर्शन योग गुरुवारी जुळून आला आहे. सकाळी ९ वाजता भाजपचे सर्व आमदार व मंत्री रेशीमबागेत जाऊन डॉ. हेडगेवार स्मृतिस्थळाला भेट देणार आहे. मागे सहसरकार्यवाह भैयाजी जोशी मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले जात होते. या वेळी कोण मार्गदर्शन करणार आहे, याविषयी भाजपचे ज्येष्ठ सदस्य अन्न-नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांना विचारले असता मार्गदर्शन वगैरे काही नसून फक्त दर्शन असल्याचे सांगितले.

या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा भाजपला घवघवीत यश मिळाले. भाजपचे १२२ आमदार निवडून आले. राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप समोर आला. मात्र, शिवसेनेच्या विरोधाच्या भूमिकेमुळे सुरुवातीला फक्त भाजपच्या दहा मंत्र्यांनीच शपथ घेतली. त्यानंतर शिवसेनेने सरकारमध्ये सहभागी व्हावे म्हणून संघाने मध्यस्थी केल्याचे बोलले जाते.