आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर्वच शासकीय कार्यालयांतील अधिकारी,कर्मचार्‍यांनी पाळले वेळेचे बंधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - सरकारी कार्यालयांना सुटीचा ‘हॅँग ओव्हर’ हे वृत्त ‘दिव्य मराठी’ने प्रकाशित केल्याने खडबडून जागे झालेल्या शहरातील सर्वच शासकीय कार्यालयांतील अधिकारी तसेच कर्मचार्‍यांनी मंगळवारी वेळेचे बंधन पाळले. सर्वच कार्यालयांमध्ये आज ‘दिव्य मराठी’चीच चर्चा होती.

मंगळवारी विभागीय आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद तसेच मनपात अधिकारी व कर्मचार्‍यांचा वक्तशीरपणा दिसला.

विभागीय आयुक्त कार्यालय
मंगळवारी सकाळी 10.15 पर्यंत कार्यालयातील सर्व विभागांत कर्मचारी-अधिकार्‍यांची 80 टक्के उपस्थिती लागली. एकाच दिवसापूर्वी आठवड्यातील तीन सुट्या असूनही सोमवारी सकाळी 10.30 पर्यंत कार्यालयात कर्मचारी आणि अधिकार्‍यांची 40 टक्केच उपस्थिती होती. सामान्य प्रशासन आणि आस्थापना या दोन्ही विभागांत ‘दिव्य मराठी’ने केलेल्या ‘लाइव्ह ऑपरेशन’च्या बातमीची चर्चा कर्मचारी आणि अधिकार्‍यांच्या गटागटांमध्ये रंगली होती.