आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पिस्तुल रोखल्याचा आमदार रावसाहेब शेखावतांवर आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - अमरावतीचे आमदार रावसाहेब शेखावत यांनी पिस्तुल रोखल्याचा आरोप कॉंग्रेसच्या माजी कार्यकर्त्याने केला आहे. या प्रकरणी त्यांनी रविवारी शहर कोतवाली पोलिसांत तक्रार दाखल केली.


मुन्ना अलिशा अजहर अली (44) असे तक्रारकर्त्याचे नाव आहे. ते कॉंग्रेसचे माजी कार्यकर्ता होते. फ्लेक्स आणि बॅनर तयार करून लावण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. 9 ऑगस्टला सकाळी 7 वाजता श्याम चौकातील उड्डाणपुलाजवळ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बॅनर लावत असताना आमदार शेखावत, त्यांचे स्वीय सचिव संजय पाटील व अन्य दोघे एका वाहनातून त्या ठिकाणी आले. आमचे बॅनर लावणे सोडून तू राष्ट्रवादी कॉंग्रेस, आमदार राणा, विश्वासराव देशमुख यांचे बॅनर का लावत आहेस, अशी विचारणा करून पिस्तुल रोखले, असा आरोप मुन्ना अलिशा यांनी तक्रारीत केला. आमदार शेखावतांच्या गोटातील म्हणून ओळखले जाणारे कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष विश्वासराव देशमुख हे मुन्ना अलिशासोबत तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात पोहोचले होते, हे विशेष. आमदाराविरुद्ध तक्रार झाल्यामुळे शहरातील राजकीय वतरुळात खळबळ उडाली आहे.