आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या व्यक्तीला भरधाव ट्रकने एकास चिरडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मॉर्निंगवॉक करून घरी परतणाऱ्या एका ५० वर्षीय व्यक्तीला भरधाव ट्रकने चिरडल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना बडनेरा मार्गावरील बेनाम चौकात गुरुवारी सकाळी नऊ वाजता घडली. मुरलीधर लक्ष्मण भोकरे (रा.साईनगर) असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी ट्रकचालक संजय अर्जुन खनपट (३५, चिंचफैल) याला अटक केली आहे. या घटनेमुळे मॉर्निंग वॉक करणाऱ्यांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दसरा मैदान येथील भोकरे ट्रेडिंगचे संचालक मुरलीधर भोकरे हे नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास मॉर्निंगवॉकसाठी घराबाहेर पडले. साईनगरातून पायदळ चालत ते बडनेरा मेनरोडवर आले. मॉर्निंग वॉक करून घरी परतत असताना बेनाम चौकात मागून बडनेराकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांना िचरडल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला. ऐन चौकात ही घटना घडल्याने लगेच नागरिकांचा जमाव घटनास्थळी जमला. जमलेल्या नागरिकांपैकी काहीनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. काही वेळातच राजापेठ पोलिस घटनास्थळी येऊन ट्रक चालक संजय खनपट याला अटक करुन एमटीव्ही ११६३ क्रमांकाचा ट्रक ताब्यात घेतला. या घटनेमुळे साईनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.