आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हजार १११ इमारतींचे मोजमाप, तिसऱ्या दिवशी होते २१८ विद्यार्थी मनपाचे अधिकारी-कर्मचारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - करवाढी साठीसुरु असलेल्या इमारतींच्या फेरसर्वेक्षणांतर्गत गुरुवारी तिसऱ्या दिवशी एक हजार १११ इमारतींचे मोजमाप केले गेले. शहराच्या सर्वच भागात म्हणजे पाचही झोनमध्ये हे अभियान राबविले गेले.

गेल्या बारा वर्षांपासून रखडलेल्या या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत असून नागरिक स्वत:हून आपापल्या बांधकामाची माहिती सर्वेअरांकडे सादर करीत आहेत. या क्रमात गुरुवारी २१८ वदि्यार्थी मनपाच्या पाचही झोनच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी इमारतींचे मोजमाप केले.

झोन क्रमांक चार मध्ये सर्वाधिक ३४८ इमारतींची मोजणी केली गेली. त्याखालोखाल झोन एकमध्ये ३१० तर झोन क्रमांक दोनमध्ये २४९ इमारतींचे मोजमाप घेतले गेले. झोन पाचमध्ये १५२ तर झोन तीनमध्ये सर्वात कमी ५२ इमारतींची मोजणी केली गेली.

मालमत्ता करापासून होणारे उत्पन्न अत्यल्प असल्यामुळे नवनियुक्त आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या निर्देशानुसार शहरात जूनपासून इमारतींच्या मोजणीचे अभियान सुरु केले गेले. प्रत्येक दिवशी किमान हजार इमारतींचे मोजमाप नोंदले जावे, असे मनपाचे लक्ष्य आहे. त्यासाठी अभियांत्रिकी तंत्रनिकेतनमध्ये शिकणाऱ्या स्थापत्य शाखेच्या वदि्यार्थ्यांचे सहकार्य घेतले जात आहे.त्यांना प्रतदिविस ४०० रुपयांचे मानधन दिले जात आहे. दोन वदि्यार्थ्यांची एक चमू अशाप्रकारे तीन चमूमागे मनपाचा एक लिपीक असे प्रत्यक्ष कामकाजाचे सूत्र आहे. एका चमूने दविसाला किमान दहा इमारतींचे मोजमाप करणे अपेक्षीत आहे.

गुरुवारच्या अभियानात कर निर्धारण संकलन अधिकारी महेश देशमुख यांच्यासह पाचही सहायक आयुक्त राहुल ओगले, योगेश पीठे, नरेंद्र वानखडे, सरिता मकेश्वर प्रणाली घोंगे, सहायक क्षेत्रीय अधिकारी, कर निरीक्षक, कर संकलक इतर कर्मचारी सहभागी झाले होते.

अडथळा निर्माण करणाऱ्याला केली अटक
झोनक्रमांक दोनमधिल पॅराडाईज कॉलनीतील एका गृहस्थाने मोजमाप करताना अडथळा निर्माण केला. अधिकाऱ्यांनी समजावून सांगितल्यानंतरही तो एेकला नाही. त्यामुळे कर निरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण विठ्ठल मोहोड आणि कर संग्राहक भगीरथ खैरकर यांनी गाडगेनगर ठाण्यात तक्रार नोंदविली. या तक्रारीच्या आधारे पोिलसांनी मो. आबीद मो. कयामी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.