आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसचा वांधा, ऑटोचा झाला धंदा!, शहर बस संपामुळे प्रवाशांचे हाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - बडनेरा-अमरावती या १० किलोमीटरच्या प्रवासासाठी तब्बल ५० रुपये भाडे देण्याची वेळ आली प्रवाशांवर आली आहे. शहर बस कर्मचाऱ्यांचा दिवसातून चार तासांचा संप सुरू असल्याने यादरम्यान ऑटो चालकाकडून अचानक भाडे वाढ केली जात आहे. शहर बस ठेकेदार कर्मचाऱ्यांमधील कामगार आयुक्तांकडील चर्चा आज (११ जून) फिस्कटली, त्यामुळे संप सुरूच राहणार आहे. त्याचा फटका मात्र सर्वसामान्य प्रवाशांवर पडत असून महापालिकेसह प्रशासनाचे याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.

विविध मागण्यांना घेऊन कर्मचाऱ्यांनी दिवसातून चार तासांचा संप पुकारल्याने शहर बसची चाके १० जूनपासून चार तास थांबत आहे. सकाळी ते ११ तर सायंकाळी ते दरम्यान कर्मचाऱ्यांचा संप असला तरी हीच वेळ दररोज येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टिने महत्वपूर्ण आहे. सकाळी कार्यालयासाठी बडनेरा येथून अमरावतीकडे तर सायंकाळी अमरावतीहून ट्रेन पकडण्यासाठी बडनेराला जाण्यासाठी प्रवाशांची शहर बस वर गर्दी असते. नेमक्या याच वेळेस शहर बस बंद राहत असल्याने ऑटो चालकांची चांदी होत आहे. संपातून तोडगा निघावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या कामगार आयुक्त कार्यालयात अंबा प्रवाशी माल वाहतूक संस्थेचे संचालक तसेच कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली.

मागण्यांची पूर्तता करण्यास संस्थेच्या संचालकांनी हात वर केल्याने कोणताही तोडगा निघाला नाही. महापालिकेसमोर बेमुदत उपोषण केल्यानंतर तत्कालीन आयुक्त अरुण डोंगरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत संस्थेच्या संचालकांनी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र काही महिन्यांच्या कालावधीनंतर शहर बस कर्मचाऱ्यांवर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आली.

अंबा प्रवाशी माल वाहतूक संस्था तसेच कामगारांच्या भांडणामध्ये नुकसान मात्र प्रवाशांचे होत असल्याचे चित्र आहे. यावेळी झालेल्या बैठकीला कामगार आयुक्त जाधव, संस्थेचे अध्यक्ष प्रदीप भागवत, सचिव शरद उमक, लालबावटा शहर बस कर्मचारी संघटनेचे (आयटक) अध्यक्ष बी.के. जाधव, राजेश पंड्या,अमोल झोड, मनोज मेश्राम, भारत येवले तर कामगार सेनेचे शेखर निर्वाण यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

यासाठी आहे संप
कर्मचाऱ्यांच्याभविष्य निर्वाह निधीचे पैसे देण्यात यावे. कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा तारखेच्या आत देण्यात यावे. १८ महिन्यांचा सेवा काळ पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे वेतन लागू करा. थकीत तीन वाढीव महागाई भत्ता द्या. थकीत भविष्य निर्वाह निधीचा भरणा करीत पावत्या देण्यात याव्यात, या मागण्यांना घेऊन आंदोलन केले जात आहे.