आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड कोटींवरील कामांच्या तपासणीचा पहिला आदेश, एक पूर्ण, चार कामे पूर्णत्वाकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - आयुक्तांनी पारित केलेला हाच तो पहिला आदेश.
अमरावती - दीडकोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या पाच कामांची तपासणी करण्याचा पहिला आदेश मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी जारी केला आहे.

अमरावती मनपाचे ितसावे आयुक्त म्हणून १४ एप्रिलला रुजू झालेल्या गुडेवार यांनी बुधवारी िरतसर कामकाज सुरु केले. या कामकाजादरम्यान त्यांनी पहिला िनर्णय बांधकामांची तपासणी करण्याबाबत घेतला आहे. आमसभा आटोपल्यानंतर दुसऱ्या िदवशी (२१ एप्रिल) ही तपासणी केली जाणार आहे. नगरोत्थान अंतर्गत मनपाला २५ कोटी रुपयांचा िनधी प्राप्त झाला आहे. त्यातील साडे बारा कोटी रुपयांची कामे अमरावती मतदारसंघात तर तेवढ्याच रकमेची कामे बडनेरा मतदारसंघात सुरु आहेत. यातील मोठ्या रकमांच्या कामांची तपासणी ते स्वत: करणार आहेत. २१ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी या वेळांत ही पाहणी केली जाईल.
पाहणीदरम्यान आयुक्त, संबंधित उपायुक्त, त्या-त्या भागाचे सहायक आयुक्त, तत्कालीन शहर अभियंता, िवद्युत िवभागाचे उपअभियंता, सहायक अभियंता शक्य झाल्यास बांधकाम कंत्राटदार उपस्थित राहतील, अशी व्यवस्था करण्याच्या आयुक्तांच्या सूचना आहेत.
ज्या पाच कामांची आयुक्त पाहणी करणार आहेत त्यातील पूर संरक्षक िभंतीचे बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित चारही कामांचे बांधकाम ७० टक्के आटोपले आहे.या पाचही कामांचे इस्टीमेट एक-दीड कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, आयुक्त काय म्हणाले...
बातम्या आणखी आहेत...