आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलावंत तथा कलेचा आदर करा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - ‘संगीत, नृत्य व गायन यांबद्दल फारसे ज्ञान नाही, त्यामुळे टीव्हीवर बघूनच त्याचा आनंद घेतो. कलेबाबत अनभजि्ञ असलो, तरी कलावंतांचा आदर करतो. सभागृहात उपस्थित रसिकांनीही कलेचा आदर करावा. कलाकार जिवंत राहिला, तरच कला जिवंत राहील,’ असे प्रतिपादन पोलिस आयुक्त डॉ. सुरेश मेकला यांनी शुक्रवारी (दि. २२) केले.
दविंगत पंडित नरसिंग बोडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणप्रीत्यर्थ हेमंत नृत्य कला मंदिर संस्थेतर्फे शुक्रवारी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दविस चालणाऱ्या महोत्सवाचे उद््घाटन डॉ. मेकला यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी उद्घाटनपर भाषण करताना ते बोलत होते. गेल्या कित्येक वर्षांपासून संगीत-नृत्याचा वारसा चालत आला आहे. अमरावती जिल्हा हा सांस्कृतिक नगरी म्हणून आेळखला जातो. बोडे कुटुंबीयांनी कला जविंत ठेवली आहे. दविंगत नरसिंग बोडे यांनी सुरू केलेली नृत्याची चळवळ अजूनही सुरू आहे, त्यामुळे कला क्षेत्रात अमरावतीकरांना उल्लेखनीय कामगिरी करता आल्याचे मेकला यांनी नमूद केले.
प्रारंभी नरसिंग बोडे व नटराज यांचे पूजन करण्यात आले. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचवि प्रा. मोहन बोडे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून अमरावती विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. जयकिरण तडिके, नवी दिल्ली कथ्थक केंद्राचे राजेंद्र गंगानी, फत्तेसिंग गंगानी, विलास मराठे, शविराय कुळकर्णी, संस्कार भारतीच्या अध्यक्ष प्रा. जयश्री वैष्णव, रमेश बोडे व दत्तराज बोडे उपस्थित होते. प्रसंगी आेमप्रकाश खेमचंदानी, गंगानी बंधू व चंद्रदत्त मिश्रा यांचे मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतचििन्ह देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचा उपस्थितांनी लाभ घेतला.

गणेश वंदनाने प्रारंभ
नरसिंग बोडे यांनी रचलेले, त्यांनी संगीत दिलेले व त्यांनीच बसवलेले नृत्याने गणेश वंदनेने सांस्कृतिक महोत्सवाला सुरुवात झाली. ‘वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ’वर घुंगरांच्या आवाजात ताल धरत कलावंतांनी सभागृहात उपस्थित रसिकांचा ठाव घेतला. सतार, व्हायोलिन, तबला व हार्मोनियम यांच्या संगतीला नृत्याची अदाकारी बघताना प्रेक्षक भारावून गेले होते. त्यानंतर लगेचच पारंपरिक कथ्थकाला सुरुवात करण्यात आली. कथ्थकची अदा बघून प्रेक्षकही फदिा झाले. त्यानंतर गंगानी बंधूंनी कथ्थकचे सादरीकरण करत अनेकांची मने जिंकली.