आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती उपमहापौरांच्या पत्राला कारवाईची प्रतीक्षा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शहरातील साफसफाई व घनकचर्‍याची विल्हेवाट लावण्यात होत असलेल्या कुचराईची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी उपमहापौर नंदकिशोर वर्‍हाडे यांनी आठ महिन्यांपूर्वी दौरा केला होता. या वेळी दोषी आढळलेल्या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याबाबत प्रशासनाला पत्र पाठवून रीतसर अहवालही सादर केला. मात्र, आठ महिन्यांचा कालावधी लोटूनही प्रशासनाने कारवाई केली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. उपमहापौरांचे पत्रच अडगळीत पडते, तेथे सामान्य नागरिकांचे काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
स्वच्छता विभागाबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी आल्यानंतर आरोग्य अधिकारी (स्वच्छता) यांच्यावर कारवाई करण्यासाठी उपमहापौर नंदकिशोर वर्‍हाडे.

उपायुक्तांची ताकीद
स्वच्छता विभागाशी संबंधित आरोग्य निरीक्षक आणि बीट शिपाई यांना उपायुक्तांनी ताकीद देणारे पत्र काढले.
0 साफसफाई तसेच दैनंदिन कचरा उचलणारे कंत्राटदारावर केलेल्या दंडात्मक कारवाईचा अहवाल दोन दिवसांत सादर करावा.
0 निरीक्षक/बीट प्यून यांनी त्यांच्या प्रभागामध्ये कामगारांच्या हजेरीच्या वेळेपूर्वी उपस्थित राहावे.
0 करारनाम्यातील अटी व शर्तींप्रमाणे कामे करून द्यावीत; अन्यथा दंडात्मक कारवाई करावी.
0 साफसफाई व कचरा उचलण्याचे काम त्याच दिवशी पूर्ण करावे.
0 डास निर्मूलनांतर्गत सर्वच कामे करून घेणे.
0 आरोग्य निरीक्षकांनी आपला भ्रमणध्वनी सुरू ठेवावा, अशी सूचनाही करण्यात आली.
प्रशासन गंभीर नाही
शहरात साथीचे आजार वाढत असताना साफसफाई व कचरा उचलण्यात कमालीची दिरंगाई होत आहे. या कामी संबंधित कंत्राटदाराकडून कुचराई होत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रशासनाला मे महिन्यात पत्र दिले होते. तब्बल आठ महिन्यांत प्रशासनाने निर्णय न घेणे ही गंभीर बाब आहे. -नंदकिशोर वर्‍हाडे, उपमहापौर
कारणे दाखवा नोटीस बजावली
स्वच्छतेच्या कामात कुचराई होत असल्याच्या पदाधिकार्‍यांच्या तक्रारी आहेत. त्याबाबत आरोग्य अधिकारी (स्वच्छता) यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. कर्तव्यात कसूर आढळून आल्यास कारवाई केली जाईल.
-रमेश मवाशी, उपायुक्त, महापालिका