आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात रंगताहेत शाडू मातीचे पाच हजार गणपती बाप्पा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातील कुंभारवाडा परिसरातील मूर्तीकार रोतळे कुटूंबीय तब्बल तीन पिढ्यांपासून शाळूच्या मूर्ती बनवतात. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या रोतळेबांधव मूर्ती बनवण्यात मग्न आहेत. विदर्भातील विविध शहरांमध्ये त्यांच्याकडील मातीच्या मूर्तीला मागणी आहे. मागील तीन पिढ्यांपासून हे घराणे पर्यावरणपूरक उत्सवाचे व्रत जपत आहेत.

गणपती, दुर्गादेवी, शारदादेवी व मातीपासून विविध मूर्ती बनवण्याचे काम सध्या रामदास रोतळे व त्यांचे भाऊ हिरालाल हे करतात. गणेशोत्सवाच्या सहा महिने आधीपासून ते आकर्षक मूर्ती साकारण्यास सुरवात करतात. दरवर्षी कुंभारवाडा परिसरातील श्री दत्त संस्थान येथे मूर्ती साकारण्यास सुरवात होते. ९ इंचपासून ते ४ फुट उंच अशा सुमारे पाच हजार गणेशमूर्ती रोतळेबंधू बनवतात. यंदा विविध जिल्हातील गणेशभक्तांकडून चार हजार मूर्तींचे बुिकंग झाले असल्याची हितीती मूर्तीकार मनोहर वर्मा यांनी दिली. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ या सह अमरावती जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये मातीच्या मूर्ती दरवर्षी मागविण्यात येतात. पर्यावरणपूरक उत्सवाकडे अलिकडे नागरिकांचा कल वाढताना दिसत आहे. शहरातील व्यावसाियकही लहान आकाराच्या मूर्तींची मागणी करतात अशी हितीती रामदास रोतळे यांनी दिली आहे.

मूर्तीला रंगही केिमकल नसलेला
मातीपासून बनवलेल्या मूर्तीला आकर्षक रंग देता यावा यासाठी वारंवार हात फिरवून मूर्ती गुळगूळीत केली जाते. त्यासाठी रोतळे कुटूंबातील सदस्य प्रचंड मेहनत घेतात. मूर्ती रंगवण्यासाठीदेखील घातक केमिकल नसलेला साधा वाटर कलर वापरला जातो. इतर मूर्तीकारांनाही हे बांधव मातीपासून मूर्ती बनवण्याचे आवाहन करतात.

तीन पिढ्यांपासून बनते मातीची मूर्ती
लक्ष्मणराव रोतळे यांनी मातीपासून मूर्ती बनवण्यास सुरुवात केली होती. त्यांचा वारसा पुढे पुत्र खुशालराव यांनी स्वीकारला. त्यांची मुले रामदास व हिरालाल मातीपासून मूर्ती बनवत आहेत. तीन पिढ्यांपासून मूर्तीकलेचा वारसा त्यांनी जपला आहे.

पर्यावरण रक्षणाची जबाबदारी आपलीच
शाळूच्या मातीपासून तयार केलेल्या मूर्ती या पर्यावरण पुरक असल्याने या मूर्तींचीच स्थापना करायला पाहिजे. आपले पर्यावरण जलसाठे सुरक्षीत ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. कोणत्याही उत्सवाचा उद्देश चांगला असतो म्हणून त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होऊ नये याची नागरिकांनी काळजी घ्यायला पाहिजे.
हिरालाल रोतळे, मूर्तीकार