आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वादाच्या उकळीमध्ये 'नेस्ले'ची मॅगी बेचव,

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - आरोग्यासाठी घातक तत्त्व आढळलेल्या मॅगी नूडल्सला देशभर वादाची उकळी फुटली असताना अमरावतीमध्ये मॅगीची चव बेचव झाली आहे. ना ग्राहक मॅगी मागताना दिसत आहे. ना दुकानदार विकताना. या संदर्भात शुक्रवारी गृहिणी, ग्राहक, विक्रेते, ज्येष्ठ, आहारअभ्यासक आदी घटकांशी दै.दिव्य मराठीने संपर्क साधला असता वरील सर्व समाजघटक सतर्कतेच्या भूमिकेत दिसून आले.

ऐरवी बच्चेकंपनीचे आकर्षण असणारी तत्काळ तयार होणारी मॅगी मोठ्यामोठ्यांच्याही जीभेवर खेळत होती. मात्र मोनोसाेडियम ग्लुटामेट आणि शिसे हे घटक या नूडल्समध्ये मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात आढळून आल्याने मॅगी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अमरावती शहरातही याचे चांगलेच पडसाद उमटत असल्याचे बाजारात दिसून येत आहे. पुर्वी दिवसाला एका साधारण दुकानात किमान आठ ते दहा मॅगीचे पाकिटं विकली जात होती. मात्र सध्या मॅगीला कुणी विचारत नसल्याचे विक्रेत्यांनी सांिगतले. मॅगीला राज्य सरकारने सध्या क्लीन चिट दिलेली नसली तरी ग्राहकांनीच हे उत्पादन नाकारले आहे अशा प्रतिक्रिया काही विक्रेत्यांनी दिल्या आहेत. 'नेस्ले' कंपनीचे मॅगी नूडल्स आणि मॅगी मसाला ही उत्पादनं विक्रेत्यांनीच खरेदी करणे सध्या बंद केले आहे. काहींकडे जुना माल शिल्लक असून तो कंपनीने परत घ्यावा, अशी मागणी विक्रेत्यांनी केली आहे.
इतर उत्पादनेही तपासा
नेस्लेचीमॅगी वादात सापडली. मात्र इतर कंपनीचे नूडल्स बाजारात विकले जात आहेत. तर प्रशासनाने राज्यात मॅगीवर बंदी आणावी इतर कंपन्यांच्या उत्पादनाचीही तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
अशा घातक उत्पादनांपासून लांबच राहणे बरे
मी सुरूवातीपासूनच घातक घटक असणाऱ्या फास्टफुडच्या विरोधात आहे. मात्र लहान मुलांना मॅगीचे भलतेच आकर्षण आहे. दिवसेंदिवस मॅगीबाबत येणाऱ्या बातम्या वाचून आता मॅगीपासून लांबच राहलेले बरे. खरे तर, हा प्रकार उशीरा उघडकीस आला. अशा प्रकारांमुळे बाजारू उत्पादनांवरचा विश्वास उडतो.
जया येवतकर, गृहिणी

विक्रीवर बंदी घाला; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
नेस्लेइंडियाच्या मॅगी नूडल्स या खाद्यपदार्थाच्या विक्रीवर प्रतिबंध घालून तत्काळ साठे जप्त करण्यात यावे या मागणीसाठी व्हिजन इंटीग्रीटी डेव्हलपमेंट असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांना शुक्रवारी (दि. ४) निवेदन देण्यात आले. देशात विविध ठिकाणी मॅगी विक्रीवर बंदी असताना जिल्ह्यात मात्र विक्री चालू असल्याचे संघटनेचे म्हणने आहे. जिल्ह्यातील माल जप्त करावा विक्रेत्यांचे नुकसान कंपन्यांनी भरून द्यावे यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी संघटनेने केली आहे. निवेदनावर अध्यक्ष प्रितेश वाघमारे, उपाध्यक्ष संजय ठाकरे, सचिव सुरज हजारे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.
थोडं मागे वळून पाहू
- ते१५ वर्ष वयोगटातील मुले अधिक मॅगी खात
- मुलेमॅगीखात असल्याचा आयांनाही होता अभिमान
- मॅगीखाणे घराघरात मानले जात होते प्रतिष्ठेचे
- लहान्यांबरोबरमोठ्यांनाही लागली होती चटक
- मुलांच्याडब्यामध्येहीदिली जात होती मॅगी
सध्याची निरीक्षणं
- आयाम्हणतात मुलांना 'मॅगी मागायची नाही.'
- विक्रेतेम्हणतात 'खुप सारा माल दुकानात पडून आहे.'
- मुलंविचारतात, पालकांना 'मॅगीमध्ये काय आहे ?'
- ज्येष्ठम्हणतात, 'आम्ही आधीच सांगायचो असे भलतेच पदार्थ खाऊ नका'