आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amaravati Municipal Corporation News In Amaravati

अमरावती: मनपाचे नवे आयुक्त उद्या स्वीकारणार पदभार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महापालिकेचेनवे आयुक्त चंद्रकांत गुडेवार मंगळवारी (दि. १४) पदभार स्वीकारणार आहेत. अरुण डोंगरे यांची तडकाफडकी बदली केल्यानंतर शासनाने त्यांच्या जागी गुडेवार यांची नियुक्ती केली. सोलापूर मनपाच्या आयुक्तपदी उत्कृष्ट काम केल्याचा गौरव म्हणून गुडेवार यांना अमरावतीत पाठवल्याची माहिती अाहे. अमरावती मनपाच्या विस्कळीत यंत्रणेला ते योग्य वळण देतील, अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुडेवार सोमवारी सायंकाळी अमरावतीकडे निघतील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीदनिी ते मनपाच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारतील. प्रभारी आयुक्त असलेल्या उपायुक्त वनिायक औगड यांच्याकडून त्यांना पदभार सोपवला जाणार आहे.

डोंगरेयांची नियुक्ती थांबलेलीच
दरम्यान,बदली करण्यात आलेल्या (तत्कालीन आयुक्त) अरुण डोंगरे यांना अजूनही नवी नियुक्ती देण्यात आली नाही. त्यामुळे ते सध्या नागपूर येथील निवासस्थानी आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयात महसूल उपायुक्त (डीसीआर), अमरावतीचे उपजिल्हाधिकारी, अचलपूर-दर्यापूरचे एसडीओ आणि नंतर मनपाचे आयुक्त अशा विविध पदांवर अमरावतीत काम केलेल्या डोंगरे यांना नवी नियुक्ती कोठे मिळते, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
- चंद्रकांत गुडेवार

डोंगरे यांनी बंगला सोडला
तडकाफडकीबदली झालेल्या आयुक्त अरुण डोंगरे यांनी शुक्रवारी दुपारीच पद सोडले. उपायुक्त वनिायक औगड यांना सूत्रे सोपवून ते नागपूरकडे रवाना झाले. रवाना होण्यापूर्वी त्यांनी कॅम्प भागातील शासकीय निवासस्थानही सोडले. नागपूर येथे स्वत:चे घर असल्यामुळे त्यांनी अमरावतीच्या शासकीय निवासस्थानी फारसे घरसामान आणले नव्हते. त्यामुळे बंगला सोडताना इतर अधिकाऱ्यांना लागणारा अधिक वेळ त्यांना घ्यावा लागला नाही.