आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचे 'बल्ले-बल्ले'; एक पद मिळाले भाजपला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - प्रभागसमिती सभापतिपदाच्या (मिनी महापौर) सोमवारी पार पडलेल्या निवडणुकीत पाचही उमेदवार बिनविरोध विजयी झाले. काँग्रेसने चार जागा जिंकल्या, तर उर्वरित एका जागेवर भाजपने विजय संपादन केला. पाचपैकी तीन जागांवर महिलाराज आले असून, या पदावर केवळ दोन ठिकाणी पुरुष उमेदवारांना संधी मिळाली आहे.

निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये लुबना तनवीर, मिलिंद बांबल, ममता आवारे, चंदूमल बिल्दानी फहेमिदा नसरीन हबीब शहा यांचा समावेश आहे. यांपैकी चंदूमल बिल्दानी हे भाजपचे असून, उर्वरित चारही उमेदवार काँग्रेसचे आहेत. स्थायी समितीच्या सुदाम देशमुख सभागृहात सोमवारी सकाळी अकरा वाजता निवडणूक बैठकीचा प्रारंभ झाला. त्यानंतर प्रत्येक अर्ध्या तासाला एक याप्रमाणे दुपारी १२.४० वाजता निवडणूक अधिकारी या नात्याने जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी शेवटच्या (पाचव्या) झोनचा निकाल घोषित केला.

निवडणुकीच्या पाचही बैठकांना त्या-त्या झोनच्या नगरसेवकांना बोलावण्यात आले होते. यांपैकी बहुतेक बैठकांना सर्वांनी हजेरी लावली. बडनेरा झोन सभापतीच्या निवडणुकीसाठी महापौर स्वत: चरणजित कौर नंदादेखील त्या झोनच्या एक सदस्य (नगरसेविका) म्हणून उपस्थित होत्या. जिल्हाधिकाऱ्यांशिवाय प्रभारी आयुक्त िवनायक औगड, उपायुक्त चंदन पाटील, मुख्य लेखा परीक्षक िप्रया तेलकुंटे, सहायक आयुक्त सरिता मकेश्वर, प्रभारी नगरसचिव नरेंद्र वानखडे, याच विभागाचे इतर अधिकारी दुर्गादास मिसाळ, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर आदी मान्यवर उपस्थित होते.
शेवटच्या दिवशीच पाचही अर्ज
मिनीमहापौर पदासाठीची निवडणूक प्रक्रिया आठ एप्रिलपासून सुरू झाली होती. मात्र, सुटीपूर्वीच्या तीन िदवसांत एकही नामांकन दाखल झाले नव्हते. शुक्रवारी काँग्रेस, भाजप सेनेने प्रत्येक झोनसाठी दोन-दोन अर्जांची उचल केली होती.
राकाँ, शिवसेना शून्यावर
सुनीलकाळे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या सात सदस्यीय गटाला या निवडणुकीत एकही पद मिळवता आले नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खोडके यांना पक्षातून बाहेर काढल्यानंतर राकाँने काळे यांना गटनेता म्हणून निवडलेहोते. तीच परिस्थिती शिवसेनेची आहे. मात्र, सेना-भाजपमधील अंतर्गत करारानुसार यावेळचे पद भाजपला दिले गेले, असे सेनेचे म्हणणे आहे.
राकाँ फ्रंटला दोन जागा
विजयीउमेदवारांमध्ये चार जण काँग्रेसचे असले, तरी त्यातील दोघे नव्याने काँग्रेसमध्ये (तेही तांत्रिकदृष्ट्या) प्रवेशिलेल्या राकाँ फ्रंट गटाचे आहेत. पूर्वी आताही या गटाचे नेतृत्व काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस असलेल्या संजय खोडके यांच्याकडे आहे. त्यामुळे एका अर्थाने काँग्रेसच्या चार जागांमध्ये खोडके यांनी आपल्या पूर्वीच्या दोन जागा शाबूत ठेवल्या आहेत.
बिनविरोध विजयी झालेल्या पाचही मिनी महापौरांचा महापौर चरणजित कौर नंदा यांच्या कक्षात सत्कार करण्यात आला. छाया: मनीष जगताप
पुढील स्लाईडवर, कोणाला किती मते मिळाली