आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वाधिक विद्यार्थी संख्येत अमरावतीची घोडदौड; पटकावले अग्रमानांकन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांनी अनेक वर्षांपूर्वी अमरावतीत रोवलेल्या शिक्षणाच्या रोपट्याचा आता वटवृक्ष झाला आहे. विभागात सर्वाधिक कॉलेजेस असलेल्या अमरावतीने सर्वाधिक विद्यार्थी संख्येबाबतीत देखील अव्वल स्थान पटकावले आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांतील विद्यार्थी संख्येचा तपशील विद्यापीठ व महाविद्यालय विकास विभागाच्या पंचवार्षिक बृहत आराखड्यात नमूद करण्यात आला आहे.
अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम, बुलडाणा या पाच जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक विद्यार्थी संख्येच्या बाबतीत अमरावती पहिल्या स्थानावर आहे. दुसर्‍या स्थानावर यवतमाळ आहे. तिसर्‍या स्थानी बुलडाणा, चवथ्या स्थानी अकोला, तर पाचव्या स्थानी वाशीम जिल्हा आहे. 2012-13 या शैक्षणिक वर्षात अमरावती विद्यापीठात एकूण एक लाख 42 हजार 583 विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळवला आहे.
विद्यापीठाचे शाखानिहाय विद्यार्थी
कला : 52 हजार 76
वाणिज्य : 25 हजार 574
विज्ञान : 20 हजार 476
गृहविज्ञान : 905
शिक्षणशास्त्र : सात हजार 679
विधी शाखा : एक हजार 703
वैद्यकीय : दोन हजार 645
इंजिनीअरिंग : 31 हजार 525
अमरावतीचा शैक्षणिक आलेख
कला : 19 हजार 412
वाणिज्य : नऊ हजार 614
विज्ञान : आठ हजार 245
गृहविज्ञान : 448
शिक्षणशास्त्र : एक हजार 950
विधी शाखा : 675
वैद्यकीय : 743
इंजिनीअरिंग : 16 हजार 299