आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयुक्त साहेब, सांगा, मी सुरक्षित आहे का? पोलिस आयुक्तांना 11 वर्षीय मुलीचा प्रश्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - ‘आयुक्त महोदय, शहरातील रस्त्यांवर निघाले, की कोण गळ्यातील चेन हिसकावेल, कोण माझी छेड काढेल, याचा नेम नसतो. कितीही आरडाओरड केला, तरी वेळीच मदत मिळत नाही. पोलिसही वेळेवर येत नाहीत, सांगा, खरंच मी सुरक्षित आहे का?’, अकरा वर्षीय मुलीने पोलिस आयुक्त डॉ. सुरेश मेकला यांना हा प्रश्न केला.

चेन स्नॅचिंग, छेड काढणे, बलात्कार, विनयभंगाच्या वाढत्या घटनांमुळे संतप्त झालेल्या महिलांनी सोमवारी (ता. 23) पोलिस आयुक्तालयावर मोर्चा काढला. माहेर बहुउद्देशीय संस्था, भारतीय जनता महिला आघाडी, शिवसेना महिला आघाडी, निर्भया फाउंडेशन, पाउलवाट संघटना, इनरव्हील क्लब, समर्पिता ग्रुप, तनिष्का स्त्री प्रतिष्ठान आदी संघटनांच्या प्रतिनिधी या मोर्चात सहभागी झाल्या होत्या.

डॉ. सुरेश मेकला आयुक्त म्हणून रुजू झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी कोणत्याही मोर्चाला सामोरे जाऊन शिष्टमंडळाशी चर्चा केली. त्यामुळे आता शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत ‘फ्रंट फूट’वर येऊन काम करणार असल्याचे संकेतच डॉ. मेकला यांनी दिले. संगीता शिंदे, रंजना बिडकर, सुरेखा लुंगारे, शीला डफळापूरकर, पद्मा महल्ले, शबाना इनामदार, अलका सप्रे, आशा जुनघरे, रत्नमाला जाधव, विजया अकर्ते, अरुणा बैरागी, पूजा उमेकर, माधुरी हिरेकर, सरिता मदने, रश्मी नावंदर, माया धांडे, छाया देशमुख, अलका सप्रे आदींनी या वेळी आयुक्तांशी चर्चा केली.
छायाचित्र - माहेर बहुउद्देशीय, भाजप महिला आघाडी, शिवसेना महिला आघाडी आदी संघटनांच्या नेतृत्वात मोर्चा काढून पोलिस आयुक्तांना निवेदन देण्यात आले. छाया : शेखर जोशी