आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरनाथ यात्रेकरू पहेलगाम मुक्कामी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - प्रसिद्ध अमरनाथ यात्रेला पहेलगाम मार्गे आजपासून पुन्हा सुरुवात होणार आहे. यात्रेच्या मार्गात मोठय़ा प्रमाणात साचलेल्या बर्फामुळे पायी चालणेही कठीण झाल्याने ही यात्रा स्थगित करावी लागली आहे. बालटालमार्गे 28 जूनपासून अमरनाथ यात्रेस सुरुवात झाली होती. 7,900 भाविकांचा पहिला जत्था बालटालमार्गे रवाना झाला आहे. पहेलगाम व शेषनाग मार्गावरील बर्फ हटवण्याचे कार्य सुरू असल्याचे श्री अमरनाथ र्शाइन बोर्डाने सांगितले.

दक्षिण काश्मीरमध्ये मोठय़ा प्रमाणातील बर्फामुळे तीन दिवस पुढे ढकललेली यात्रा एक - दोन दिवसांत सुरू होण्याची शक्यता र्शाइन बोर्डाने व्यक्त केली आहे. बर्फ हटवून पायी चालण्याइतपत मार्ग तयार झाला, की कोणत्याही क्षणी यात्रा सुरू होण्याची शक्यता आहे.

पहेलगाममार्गे सुरू होणार्‍या यात्रेबाबत श्री अमरनाथ र्शाइन बोर्डाकडे विचारणा केली असता, तेथील मार्गदर्शक अमरजितसिंग यांनी ‘दिव्य मराठी’ ला ही माहिती दिली.

यात्रेदरम्यान ठिकठिकाणी अन्नछत्रे, रुग्णालये, प्राथमिक उपचार केंद्रे, सुरक्षा पथक आणि इतर सुविधा उभारल्या आहेत. या मार्गावर भारतीय लष्कर, सीमा सुरक्षा दल, जम्मू-काश्मीर पोलिस, केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या जवानांच्या मदतीने सुरक्षेचा बंदोबस्त केला आहे. यंदा यात्रेच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. देशभरातून लाखो भाविक बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी रवाना होतात.

7,800 भाविक अडकले
अमरनाथ यात्रेला जाण्यासाठी महाराष्ट्र आणि गुजरातमधील यात्रेकरूंचे जत्थे 27 जूनपासून पहेलगामला मुक्कामी आहेत. जवळपास 7,800 यात्रेकरू पहेलगाम मार्गे अमरनाथकडे रवाना होणार आहेत. पहेलगाम-शेषनाग मार्गे यात्रा सुरू होण्याची आतुरतेने वाट बघत असल्याचे सुरत येथील धर्मेश राऊजी भाई या यात्रेकरूने पहेलगाम येथून ‘दिव्य मराठी’ला सांगितले.
पहेलगाम-शेषनाग मार्गावरील बर्फाचे ढीग हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू : र्शाइन बोर्ड

(फोटो - संग्रहित छायाचित्र)