आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामटेककरांनी अनुभवला अॅम्फिबीयन विमानाचा चित्‍तथरारक अनुभव ।

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पर्यटनामध्‍ये सी प्‍लेन प्रकल्‍पाला महाराष्‍ट्रात मंजूरी मिळाल्‍याने राज्‍य भारतातील पहिले पहिले राज्‍य बनले आहे्. ज्‍याने सी प्‍लेन प्रकल्‍प सर्वप्रथम राबविला आहे. 15 नोव्‍हेंबर रोजी खिंडसी जलाशयावर अॅम्फिबीयन विमानाची यशस्‍वी चाचणी झाली आहे. पुढील चाचणीसाठी हे विमान नवेगाव खैरी येथील जलाशयावर प्रायोगिक चाचणीसाठी नेण्‍यात येणार आहे.
महाराष्‍ट्रामध्‍ये हा प्रकल्‍प यावा यासाठी आशिष्‍ा जयस्‍वाल यांनी अविरत कष्‍ट केले आहेत. या अभुतपूर्व प्रकल्‍पाचे स्‍वागत करण्‍यासाठी नागपुरमधील प्रतिष्‍ठीत नागरिक तसेच माध्‍यमकर्मींनी मोठ्या संख्‍येने हजेरी लावली होती.
पहिली महिला वैमानिक
अॅम्फिबीयन जल विमानाची पहिली भारतीय महिला वैमानिक कॅप्‍टन प्रियंका मनुज व सहवैमानिक कॅप्‍टन राहूल व कॅप्‍टन गौतम होते.

रोजगाराच्‍या संधी
या प्रकल्‍पामुळे स्‍थानिक युवकांना फायदा होणार आहे. रोजगाराच्‍या नव्‍या संधी उपलब्‍ध होणार आहेत. एकूणच रामटेक क्षेत्र ख-या अर्थाने जगाच्‍या नकाशावर येण्‍यास हा प्रकल्‍प मोलाचा हातभार लावणार आहे.
या प्रकल्‍पामुळे साहसी खेळांचे महत्‍व वाढेल. तसेच रामटेक पर्यटनाचे केंद्र म्‍हणून उभारी घेईल.
पुढील स्‍लाइडवर पाहा, पहिल्‍या वहिल्‍या जलविमानाचे छायाचित्रे....