आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमरावती: मालिका चेनस्नॅचिंगची; चोरटे मोकाटच, शहरातील महिलांमध्ये भीती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - मागील नऊ दिवसांपासून शहरातील विविध भागांत मंगळसूत्रचोरांनी पाच महिलांचे मंगळसूत्र लंपास केल्यावरही चोरट्यांतच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलेले नाही. मंगळवारी सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास पुन्हा एका महिलेच्या गळ्यातील 45 हजारांची सोनसाखळी भामट्यांनी हिसकवून नेली. यावेळी महिलेच्या गळ्याला दुखापत झाली. या घटनेने अमरावतीकर महिला सुरक्षित आहेत काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सुधा अनिल तिवारी (27 रा. शारदानगर) असे सोनसाखळी लंपास झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांच्या प्रज्ञ या तीन वर्षाच्या मुलाला इंडो पब्लिक स्कूलमध्ये सोडून देण्यासाठी त्या निघाल्या. घराच्या परिसरातच दुचाकीस्वार दोन आले आणि मागच्याने त्यांच्या गळ्यातील 45 हजारांची 16 ग्रॅम वजनाची सोनसाखळी हिसकवून नेली. तिवारी यांनी आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेतली. तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. भामट्याने सोनसाखळी ओढल्यामुळे तिवारी यांच्या गळ्याला दुखापत झाली आहे. दुचाकीची नंबर प्लेट चिखलाने माखल्याने क्रमांक टिपता आला नाही, असे तिवारी यांनी पोलिसांना सांगितले.

ठाणेदारांना आयुक्तांचे नाराजीपत्र

सातत्याने होणार्‍या मंगळसूत्रचोरी थांबविण्यात पोलिसांना अपयश येत आहे. ज्या ठाण्यांच्या हद्दीत आतापर्यंत घटना घडल्या, त्या ठाणेदारांना पोलिस आयुक्त बुधवारी नाराजीपत्र देणार आहेत. याच पार्श्वभूमिवर मंगळवारी त्यांनी तब्बल चार तास बैठक घेतली. तसेच चार्ली कमांडोंनाही आर्थिक दंड ठोठावणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.

महिला पोलिसाचे दागिने लुटणारे अटकेत
विद्यापीठ मार्गावर महिला पोलिसाचे दागिने लुटणार्‍या दोघांना गुन्हे शाखेने मंगळवारी अटक केली. 28 जूनच्या या घटनेनंतर आरोपी पसार झाले होते. र्शावण अंबादास साहू (वय 29) आणि गजानन गणपत चपारिया (वय 19 रा. परदेशीपुरा) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिस मुख्यालयात कार्यरत मीना रताळे या 28 जूनला विद्यापीठ मार्गावरून जात असताना भामट्यांनी त्यांना अडवून 13 हजारांचे दागिने लुटले होते. गुन्हेशाखा पोलिसांनी दोघांना अटक केली.

पोलिसांचे प्रयत्न अयशस्वी

मंगळसूत्रचोरीचे सत्र वाढल्यामुळे पोलिसांनी संशयितांचे स्केच तयार केले, तीन दिवस नाकेबंदी केली आणि एक दिवस शहरातील लॉजची झडती घेतली. सुरुवातीच्या दोन घटनांनंतर पोलिस उपायुक्त संजय लाटकर यांनी शहरातील 25 संशयितांची चौकशी केली होती. मात्र, आतापर्यंत पोलिस मंगळसूत्रचोरांना आवर घालू शकले नाहीत. दीड वर्षांपूर्वी शहरात मंगळसूत्रचोरीचे सत्र सुरू झाले त्यावेळी पेालिसांनी र्शीरामपूरची इराणी टोळी पकडली होती.

दहा दिवसांत चोरट्यांनी मारला 2.75 लाखांवर डल्ला

18 ऑगस्ट : राजापेठ ठाणे, गणेशपेठ परिसर
0वेळ सकाळी 8.30
0माधुरी केडिया : 35 हजार मंगळसूत्र
20 ऑगस्ट : गाडगेनगर ठाणे, रामपुरी कॅम्प
0वेळ सकाळी 8.30
0माया देवानी : 45 हजार सोनसाखळी
20 ऑगस्ट : फ्रेजरपुरा ठाणे, चैतन्य कॉलनी
0सकाळी 11.30
0जया तांबूसकर : 45 हजार मंगळसूत्र
23 ऑगस्ट : बडनेरा ठाणे, मलकापूर पांढरी
0दुपारी 2.30
0जया भटकर : 15 हजार मंगळसूत्र
24 ऑगस्ट : राजापेठ ठाणे, दसरा मैदान
0सायंकाळी 7
0मंदाकिनी थोरात : 60 हजारांचे मंगळसूत्र पडले
25 ऑगस्ट : खोलापुरी गेट, दहीसाथ
0सायंकाळी 4
0सुमन हरमकर : 40 हजारांचे दागिने लंपास (बतावणी करून)
27 ऑगस्ट : राजापेठ ठाणे, शारदानगर
0सकाळी 9.30
0सुधा तिवारी : 45 हजारांची सोनसाखळी