आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑडी धडकेत मुलाचा अंत, गाडीचा चालक व मालकाला मारहाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - नाशिकहून नागपूरकरिता निघालेल्या भरधाव ऑडी कारने एक्स्प्रेस हायवेवर गुरुवारी दुचाकीला धडक दिली. यामध्ये 14 वर्षीय मुलाचा करुण अंत झाला. घटनेनंतर संतप्त जमावाने कारची तोडफोड करत चालक आणि गाडीच्या मालकाला मारहाण केली. यामुळे अपघातस्थळी काही काळ तणाव निर्माण झाला होता.
शेख समीर शेख हबीब (14 रा. अंजनगावबारी) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. अपघातात शे. इजाज (35 रा. अंजनगावबारी) हे जखमी झाले. जखमी व मृतक हे नातेवाईक आहेत. ते दुचाकीने (एम. एच. 27 एम 4575) अंजनगावबारीहून बडनेराकडे येत होते. याच वेळी एक्सप्रेस हायवेवरील राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालय टी-पॉइंटवर नागपूरच्या दिशेने जाणार्‍या ऑडीने (एम. एच. 15 ईबी 6543) दुचाकीला धडक दिली. यामध्ये शे. समीरचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जमावाने ऑडीचालक परमेश्वर युवराज पाटील (24 रा. जामनेर, जि. जळगाव) आणि मालक राजेंद्रसिंह भगतसिंह चव्हाण (59, रा. नाशिक ) यांना मारहाण केली.
चव्हाण हे प्लायवूडचे होलसेल व्यापारी आहेत. चालक परमेश्वर पाटील याला बडनेरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.