आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमरावती शहराची लोकसंख्या साडेआठ लाख, मात्र पोस्टमन फक्त 81

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - साडेआठ लाख लोकसंख्येच्या अमरावती शहरात अवघे 81 पोस्टमन आहेत. त्यामुळे एकाच कर्मचार्‍याला तब्बल साडेदहा हजार नागरिकांची डाक वाटण्याचा ताण सहन करावा लागतो, अशी सद्य:स्थिती आहे.
शहरभर अवघी 17 टपाल केंद्रे आणि त्यातही डाक वाटप करणारी केंद्रे केवळ सात अशी या विभागाची व्याप्ती आहे. विशेष असे की, गेल्या दहा वर्षांत ही संख्या एकानेही वाढली नाही. उलट केंद्रांची संख्या एकोणवीसहून दोनने कमी झाली. निवृत्तीमुळे कर्मचार्‍यांची संख्याही घटली. परिणामी उर्वरित कर्मचार्‍यांवर मोठा ताण आहे.


80 पार्सल
184मनीऑर्डर
900रजिस्टर्ड पोस्ट


पैसे परदेशात पाठवण्याचीही सोय
टपाल खात्याने देशांतर्गत मनीऑर्डरसारखीच परदेशात पैसे पाठवण्याचीही सोय केली आहे. वेस्टर्न युनियन, मनी ट्रॉन्सफर अशी ही सेवा आहे. याशिवाय पार्सलही परदेशात पाठवता येते. सेवा फक्त अमरावती येथे मुख्य डाकघर आणि परतवाडा येथील डाक कार्यालयातच उपलब्ध आहे.

वितरणाची सोय केवळ सात ठिकाणी
टपाल वितरणाची सोय असलेली केवळ सातच केंद्रे आहेत. या ठिकाणीच पोस्टमनची (कंसात त्या-त्या ठिकाणची संख्या) उपस्थिती असते. यामध्ये मुख्य डाकघर (15), रुक्मिणीनगर (13), कॅम्प (10), साईनगर (7) यांचा समावेश आहे.


टपाल तिकीट विक्रीची 17 केंद्रे
मुख्य डाकघर, कॅम्प, अंबापेठ, बडनेरा, बडनेरा जुनीवस्ती, भाजीबाजार, काँग्रेसनगर, कॉटन मार्केट, कंवरनगर, र्शी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, राजापेठ, रुक्मिणीनगर (सध्या सबनीस प्लॉट येथे), विद्यापीठ, शिवाजीनगर, विदर्भ महाविद्यालय परिसर, चांदनी चौक


1000 स्पीड पोस्ट
दोन हजारांवर नागरिकांना लाभ
मुख्यालयासह सर्व 17 केंद्रे मिळून शहरात दररोज 1000 नागरिक स्पीड पोस्टने टपाल पाठवतात. 900 जण रजिस्टर्ड सेवेचा, 184 नागरिक मनीऑर्डरचा, तर 80 नागरिक पार्सल सेवेचा वापर करतात. नेटच्या जमान्यातही टपालाचा अधिक वापर होत आहे. डी. व्ही. बिंड, लिपिक, प्रवर अधीक्षक कार्यालय, अमरावती.