आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलयुक्त शिवार : आमदारांनी घेतला पुढाकार; स्वनिधीची केली घोषणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जलयुक्त शिवार अभियानासाठी सध्या अंदाजे ४० कोटी रुपयांची उणीव भासत आहे. यासाठी आमदार डॉ. बोंडे, वीरेंद्र जगताप आणि अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी स्वनिधी देण्याची घोषणा करून कोणत्याही परिस्थितीत कामे बंद पडू देण्याचे आश्वासन दिले. शेतकर्‍यांच्या हितासाठी हा निर्णय घेत असल्याचे सांगून विकासाच्या मुद्द्यावर पक्षीय राजकारण बाजूला पडल्याचे यावरून बैठकीत दिसून आले.

जिल्ह्यातील खरीप आढावा बैठकीत जलयुक्त शिवार अभियानाचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात जलयुक्त शिवाय योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात नाला खोलीकरण, बंधारे आदी कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. सध्या या कामांसाठी निधी कमी पडत आहे. हा निधी दोन तीन महिन्यांनी उपलब्ध होणार आहे. परंतु निधीअभावी कामे बंद पडल्यास पाण्याचे प्रचंड नुकसान होणार आहे. यामुळे प्रथमच तिन्ही आमदारांनी पक्षीय राजकारणाला तिलांजली देऊन आमदार निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यावर अ‍ॅड. ठाकूर पालकमंत्र्यांना म्हणाल्या, विशेष निधीचे वाटप करताना भाजपच्या आमदारांना अधिक निधी आम्हाला कमी असा अन्याय होऊ नये. यावर पालकमंत्र्यांनी निधीचे समान वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले.

कर्ज पुनर्गठनात राष्ट्रीयीकृत बँकांनी व्याज घेऊ नये
खरीपआढावा बैठकीत कर्ज पुनर्गठनाचा मुद्दा डॉ. बोंडे यांनी उपस्थित केला. राज्य शासनाने शेतकर्‍यांचे व्याजमाफीची घोषणा केली आहे. कर्जाचे पुनर्गठन करताना कोणत्याही बँकांनी व्याज वसुली करू नये, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी िदले आहेत; परंतु राष्ट्रीयीकृत बँका पुनर्गठन झाल्यानंतर व्याज कापून घेत असल्याचे डॉ. बोंडे यांनी सांिगतले. यावर तिन्ही आमदारांनी आक्रमक पवित्रा घेऊन शिखर बँकेच्या व्यवस्थापकांना चांगलेच धारेवर धरले.