आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती-मोर्शी मार्गावर एसटीची ऑटोला धडक, देवीदर्शनाला जाणारे पाच भाविक ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोर्शी / अमरावती - मोर्शीपासून नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या बेलवन फाट्याजवळ अँटो आणि एसटी बसमध्ये समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात पाच जण ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले. सोमवारी दुपारी झालेल्या या अपघातातील मृतांमध्ये अँटोचालक बाप लेक तसेच दोन मुलींसह एका महिलेचा समावेश आहे. ऑटो क्रमांक एम. एच. 27 पी 6317 घेऊन अहमदतुल्ला खान मुलगा जुबेरतुल्ला याला घेऊन अमरावतीला जाण्यासाठी निघाले होते.

रस्त्यात त्यांना पिंगळाई देवीच्या दर्शनासाठी जाणारे नऊ भाविक भेटले. अँटो रिकामाच असल्याने खान यांनी भाविकांना देवीच्या दर्शनासाठी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. बेलवन फाट्याजवळ बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात अँटोचे टायर फुटल्याने आणि रस्ता खराब असल्याने अँटो आणि अमरावतीकडे जाणार्‍या एस. टी. बस क्रमांक एम. एच. 40 / 8350 यांच्यात समोरा-समोर भिषण धडक झाली. अपघातात ऑटोचालक अहमदतुल्ला व त्यांचा मुलगा जुबेरतुल्ला आणि प्राची खटाळे या तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अन्य दोघा प्रवाशांचा उपचारासाठी अमरावतीला आणताना वाटेत मृत्यू झाला. अपघाताची माहीती मिळताच शिरखेड व मोर्शी पोलिस घटनास्थळी पोहचले. नागरीकांच्या मदतीने पोलिसांनी जखमींना तातडीने उपचारासाठी अमरावतीला रवाना केले आहे. खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.

पुढील स्लाइडमध्ये, जखमींची नावे