आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amravati Municipal Corporation By Election BSP Win

भाजप-शिवसेनेत संघर्षाची ठिणगी; दोघांच्या भांडणात बसप विजयी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - किरणनगर प्रभागाच्या पोटनिवडणुकीच्या निमीत्ताने शहरातील राजकीय संघर्ष परत एकदा समोर आला असून भाजपचे उमेदवार दीपक खैरकर यांच्यावर त्यांच्या घरात शिरून चाकूने हल्ला करण्यात आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. शिवसेना व भाजपमधील संघर्षातून हा प्रकार घडल्याचे स्पष्ट होत आहे. कारण हल्लेखोरांनी शिवसेनेचा उमेदवार तुमच्यामुळेच पराभूत झाल्याचा आरोप करीतच हा हल्ला चढविला.

रविवारी पोटनिवडणुकीचे मतदान झाले व सोमवारी मतमोजणी झाली. किरणनगर प्रभागाच्या पोटनिवडणुकीत दीपक खैरकर यांना 191 मते मिळाली. दुपारी 3.30 वाजता चार युवक त्यांच्या घरात शिरले. खैरकर यांचा मुलगा अनुराग अंगणात होता. त्याला युवकांनी दीपक खैरकर यांच्याशी महत्त्वाचे बोलायचे असल्याचे सांगितले. खैरकर खाली आले आणि त्या युवकांशी बोलले. त्यावेळी युवकांनी त्यांना बाहेर बोलावले. पण, घरात शिरून युवकांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला. तुमच्यामुळे आमच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला, असे ते म्हणत होते. अनुरागने हल्लेखोरांना थोपवण्याचा प्रय} करताच चौघांपैकी एकाने चाकू काढून खैरकर यांच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. यानंतर हल्लेखोर काळ्या रंगाच्या दुचाकीने नरसम्मा महाविद्यालयाच्या प्रागंणातून पसार झाले. परिसरातील नागरिकांनी यावेळी हल्लेखोरांच्या दुचाकीचा क्रमांक टिपला. घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुराचे ठाणेदार रियाजोद्दीन देशमुख पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांना नागरिकांनी एम. एच. 27-4925 या क्रमांकाची दुचाकी असल्याची माहिती दिली. भाजपचे शहराध्यक्ष तुषार भारतीय यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही खैरकर यांच्या घरी धाव घेतली. या प्रकरणी फ्रेजरपुरा ठाण्यात हल्लेखोरांवर घरात घुसून शिवीगाळ, जिवे मारण्याची धमकी व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती ठाणेदार देशमुख यांनी दिली.

पुढील स्लाइडमध्ये, शिवसैनिक असे करणार नाहीत

बसपाने गड राखला, आंबेडकरी विचारांचा विजय