आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amravati Municipal Corporation News In Divya Marathi

आठ हजारांवर इमारतींना लागला मनपाचा "टेप", दररोज सरासरी हजार इमारतींची मोजदाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - फेरकर आकारणीसाठी सुरू असलेल्या इमारतींच्या मोजमाप अभियानाने आठ हजारांचा आकडा पार केला आहे. गेल्या दोन जून रोजी हे अभियान सुरू झाले होते. या कालावधीत ८०२५ इमारतींची मोजदाद पूर्ण केली गेली. दरम्यान आज, गुरुवारी शहराच्या पाचही झोनमधील ११५९ इमारतींचे सर्वेक्षण करण्यात आले. सकाळी आठ ते दुपारी एक या वेळात ही मोहीम राबवली गेली.
आजच्या कारवाईत अभियांत्रिकी महाविद्यालय तंत्रनिकेतनचे २२२ िवद्यार्थी सहभागी झाले होते. शहरात दीड लाख इमारती आहेत. मात्र, या सर्व इमारतींचे अंतर्गत मोजमाप गेल्या बारा वर्षांत केले गेले नाही. त्यामुळे मालमत्ता करापासून िमळणारे उत्पन्न अत्यंत कमी आहे. ही िस्थती बदलण्यासाठी मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी सर्व इमारतींच्या फेरमोजणीचा धाडसी निर्णय घेतला. त्याद्वारे मालमत्ताकराच्या वसुलीत मोठी वाढ होईल, अशी मांडणी केली आहे. िवशेष असे की मोजमाप घेण्याच्या प्रक्रियेचा रोजचा आढावा स्वत: गुडेवार घेत असून, दोन्ही उपायुक्त िवनायक औगड चंदन पाटील यांनाही या कामाची माहिती ठेवणे अनिवार्य केले आहे. दरम्यान आजच्या कारवाईत अभियांत्रिकी तंत्रनिकेतनच्या िवद्यार्थ्यांसह सहायक आयुक्त राहुल ओगले, सरिता मकेश्वर, प्रणाली घोंगे, नरेंद्र वानखडे, योगेश पिठे आणि कर विभागातील िनरीक्षक, िलपीक िशपायांनी भाग घेतला.

पुढे काय होणार ?
मोजदादकेल्या जाणाऱ्या इमारतींवर आकारण्यात आलेला कर कमी की जास्त हे या अभियानातून स्पष्ट होणार आहे. बहुतेक इमारतधारकांनी मनपाला सूचना देताच अंतर्गत बदल केले असून, त्यांना बांधकाम केल्यापासून ते आजपर्यंत त्याचा वापर केला म्हणून कर द्यावा लागणार आहे. िशवाय अतिरिक्त बांधकाम िनयमानुकूल करण्यासाठी वाढीव एफएसआयचा फायदा घेत दंडाची वेगळी रक्कमही मनपात जमा करावी लागणार आहे.
आतापर्यंत फत्ते झाल्या ८०२५ इमारती
गेल्याआठ िदवसांत मनपा पथकाने आठ हजार २५ इमारतींचे मोजमाप पूर्ण केले. पहिल्या िदवशी ९४८, दुसऱ्या िदवशी ११८८, ितसऱ्या िदवशी ११११, चौथ्या िदवशी १२२३, पाचव्या िदवशी १२२०, सहाव्या िदवशी १२२४ , सातव्या िदवशी ११७५ तर आठव्या िदवशी ११५९ इमारतींची मोजणी पूर्ण केली गेली. अशाप्रकारे एकूण दीड लाख इमारतींच्या तुलनेत शहरातील अंदाजे आठ टक्के इमारतींचे मोजमाप पूर्ण झाले आहे.

गुगल मॅपचाही ‌उपयोग
अंतर्गत आणि बाह्यगत मोजमाप तर सुरुच आहे. याशिवाय नाला, रस्ता, बगीचा, खेळाचे मैदाने आदी सार्वजनिक िठकाणांच्या काठावरील जागा िगळंकृत करण्याचे प्रमाणही बऱ्यापैकी वाढले आहे. गुगल मॅपचा आधार घेऊन तेही पडताळून पाहता येते. तशा सूचना मी संबंधित यंत्रणेला िदल्या आहेत. चंद्रकांतगुडेवार,मनपा आयुक्त, अमरावती.

गुरुवारी मोजदाद झालेल्या इमारती अशा
- झोन क्रमांक एक - ३९१
- झोन क्रमांक दोन - २६१
- झोन क्रमांक तीन - ९०
- झोन क्रमांक चार - २३८
- झोन क्रमांक पाच - १७९
- एकूण - ११५९