आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amravati News In Marathi, Raosaheb Shekhawat, Congress, Divya Marathi

माजी राष्ट्रपती पुत्रापुढे निवडणूक जिंकण्याचे मोठे आव्हान, भाजपचा उमेदवार देणार तगडी टक्कर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचा जनमानसात असलेला प्रभाव, काँग्रेसचे माजी राज्यमंत्री आणि जनविकास काँग्रेसचे संस्थापक डॉ. सुनील देशमुख यांचा संभाव्य भाजप प्रवेश आणि शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांची निवडणूक तयारी या पार्श्वभूमीवर माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पुत्र व काँग्रेसचे विद्यमान आमदार रावसाहेब शेखावत यांच्यासमोर अमरावती मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकणे हे यंदा आव्हानच असेल.

मागील वधिानसभा निवडणुकीत काँग्रेसचे तत्कालीन राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांचे तिकीट कापून रावसाहेब शेखावत यांना काँग्रेसने उमेदवारी बहाल केली होती. देशमुख यांचे तिकीट कापल्याने नाराज झालेले शहरातील काँग्रेसचे काही पदाधिकरी देशमुख यांच्यासमवेत गेले होते. त्या वेळी प्रतिभाताई राष्ट्रपतिपदी होत्या. त्यामुळे देश- विदेशातील प्रसारमाध्यमे आणि राजकीय पुढाऱ्यांचे अमरावती मतदारसंघाकडे लक्ष होते. रावसाहेब शेखावत विरुद्ध डॉ. सुनील देशमुख ही लढत आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय झाली होती. त्यामुळे कोणत्याही परििस्थतीत िवजय िमळवणि्याचे आव्हान त्या वेळी राष्ट्रपती पुत्रापुढे होते.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत शेखावत यांनी देशमुख यांच्यावर साडेसहा हजार मतांच्या फरकाने निसटता विजय मिळवला होता. त्याच वेळी २०१४ च्या निवडणुकीत शेखावत यांचा पराभव करण्याचे देशमुखांनी ठरवले हाेते. मात्र, यंदा देशमुख कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवतील याबाबत अजूनही स्पष्टता नाही. येत्या काही दिवसांत याबाबतचे चित्र स्पष्ट होईल, असे सूत्रांनी सांिगतले.

भाजपकडून आॅफर
कॉंग्रेसच्या विद्यमान मंत्र्याचे तिकीट कापून राष्ट्रपती पुत्राला उमेदवारी दिल्यामुळे अमरावती मतदारसंघातील निवडणूक चांगलीच गाजली होती. मात्र, आता प्रतिभाताई राष्ट्रपती नाहीत. मात्र, माजी राष्ट्रपती म्हणून त्यांचा काँग्रेसमध्ये अद्यापही दबदबा आहे. शेखावत यांचे तिकीट कापून काँग्रेसची उमेदवारी मिळवणि्याचे प्रयत्न सुनील देशमुख यांच्याकडून झाले होते. मात्र, त्याला यश आले नाही. परिणामी, अमरावती मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या भाजपच्या प्रस्तावावर देशमुख अद्यापही संभ्रमावस्थेत आहे.

पाच वर्षांतील िवकासकामावर मागणार मते
मागील पाच वर्षांत मतदारसंघात विकासाच्या अनेक योजना आणल्या. मॉडेल रेल्वे स्टेशन, फनिले मिल, रेल्वे कोच दुरुस्ती कारखाना असे उपक्रम सुरू केले. विकासाच्या नावावरच या वेळी निवडणुकीला सामोरे जात आहोvत. सुनील देशमुख भाजपमध्ये जातात की स्वतंत्र निवडणूक लढवितात यावरही बरेच काही अवलंबून आहे. - रावसाहेब शेखावत, आमदार

मागील निवडणुकीपेक्षा वेगळी परिस्थिती
गेल्या निवडणुकीत प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती होत्या. त्यामुळे त्यावेळची परिस्थिती वेगळी आहे. या निवडणुकीत शेखावत परिवाराकडे फारसे बळ उरलेले नाही आणि पाच वर्षांतील कामगिरी समाधानकारक नसल्याने रावसाहेब शेखावत यांच्याविषयी मतदारांचा भ्रमनिरास झाला.
डॉ. सुनील देशमुख, माजी राज्यमंत्री