आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आराधना शोरूम फोडले; साडेतीन लाखांची चोरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - जवाहर रोड स्थित तयार कपड्यांच्या ‘आराधना’ प्रतिष्ठानात खिडकीवाटे शिरून चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्री साडेतीन लाख लंपास केले.शोरूमच्या जागेत किरकोळ बांधकाम सुरू आहे. चोरट्यांनी याचा फायदा घेत एका बाजूला असलेल्या खिडकीतून दुकानात प्रवेश केला.

यानंतर गल्ल्यातील साडेतीन लाखांवर त्यांनी हात साफ केला. आराधनाचे संचालक पूरणचंद हबलानी यांच्या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे.