आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Apply Mandal Commission To Wanjari Community,Gopinath Munde Demand To Centre

वंजारी समाजाला मंडल आयोग लागू करा, गोपीनाथ मुंडे यांची केंद्राकडे मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेगाव (जि. बुलडाणा)- वंजारी समाज आजही आर्थिकदृष्ट्या मागास आहे. आर्थिक उत्क्रांती होण्यासाठी त्यांना मंडल आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, अशी मागणी आपण केंद्राकडे केली आहे. तेव्हा, समाजाने अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संघर्षाची तयारी ठेवावी, असे आवाहन भाजपचे लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी गुरुवारी केले.
विदर्भस्तरीय वंजारी समाज मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भास्कर आव्हाड होते.
मुंडे म्हणाले की, वंजारी समाजाला मंडल आयोगाच्या शिफारशी लागू होण्यासाठी या समाजाची जनगणना होणे आवश्यक आहे. समाजाने आपले भविष्य घडवण्यासाठी शिक्षणाची कास धरणे आवश्यक आहे. तेव्हा, समाज बांधवांनी आपल्या पाल्यांना कितीही खडतर परिस्थिती असली तरीही शिकवले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. ‘एकमेकांचे पाय ओढणे ही खेकडा प्रवृत्ती प्रत्येक माणसात असते. तिचा त्याग केला तरच खेकडा प्रवृत्ती सोडणे आवश्यक समाजाला विकास साधणे शक्य होईल. तेव्हा, समाजाची घडी नीट करण्यासाठी आपले कुटुंब आधी व्यवस्थित करा’, असे माजी आमदार उषा दराडे यांनी म्हटले.
स्वागताध्यक्ष डॉ. राजेंद्र वाघ, आमदार भाऊसाहेब फुंडकर, आ. डॉ. संजय कुटे आदींंची प्रमुख उपस्थिती होती.
खेळपट्टीवर उतरवले हेलिकॉप्टर : गोपीनाथ मुंडे शेगाव येथे हेलिकॉप्टरने आले. दुपारी 12.30 वाजता त्यांचे हेलिकॉप्टर संतनगरीच्या अवकाशात घोंगावू लागले. संत श्री गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानात हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली होती. हेलिकॉप्टरने दोन घिरट्या घातल्या. मात्र, वैमानिकाला हेलिपॅड दिसले नाही. खामगाव मार्गावरील स्व. गजाननदादा पाटील मार्केट यार्डात वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली होती. तेथे मोठ्या प्रमाणात चारचाकी वाहने उभी करण्यात आली होती. तर, या मैदानावर क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याचे खेळपट्टी तयार करण्यात आली होती. हेलिकॉप्टर पाटील मार्केट यार्डात क्रिकेटच्या खेळपट्टीवर उतरवले. ठाणेदार डी. डी. ढाकणे पोलिस ताफ्यासह मार्केट यार्डात पोहचले. तोपर्यंत हेलिकॉप्टर व्यवस्थित लॅन्ड झाले व मुंडे सुखरूप उतरले.