आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Army Recruitment Examination Paper Leaked In Nagpur

नागपुरात सैन्य भरती परीक्षेचा पेपर फुटला,केंद्रीय अन्वेषण विभागाने केले मोबाईल जप्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - सैन्य भरती पूर्व लेखी परीक्षेतील गैरप्रकार सीबीआयने रविवारी उघडकीस आणला. परीक्षा देणा-या उमेदवारांना मोबाईलवर उत्तरे पाठविली जात असल्याचा प्रकार परीक्षा केंद्रावर आढळून आला असून, सीबीआयने सहा उमेदवारांचे मोबाईल जप्त केले. यासंदर्भात एका कोचिंग क्लास संचालकासह परीक्षा मंडळातील अज्ञात अधिका-यांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
मात्र रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक झालेली नव्हती. या घोटाळ्यात कोण सहभागी आहेत, हे उद्यापर्यंत स्पष्ट होईल असा दावाही संबंधित अधिका-यांनी केला. सीबीआयच्या एका पथकाने परीक्षा प्रशिक्षण केंद्राच्या कार्यालयावर छापा घालून तेथून काही दस्तऐवज ताब्यात घेतले आहेत.