आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अरुण गवळीचा तुरुंगाबाहेर मुक्काम वाढला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - मुलाच्या लग्नासाठी तुरुंगातून बाहेर आलेला अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या पॅरोलची मुदत संपली आहे. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याचिका दाखल करण्यासाठी त्याला २६ मे पर्यंत संरक्षण दिले आहे. त्यामुळे गवळीचा तुरुंगाबाहेरील मुक्काम वाढला.

अरुण गवळीचा मुलगा महेश याचे ९ मे रोजी लग्न होते. त्यासाठी उच्च न्यायालयाने त्याला १५ दिवसांचा पॅरोल मंजूर केला होता. पॅरोल मंजूर झाल्यानंतर ६ मे रोजी गवळी कारागृहाबाहेर आला. त्याच्या पॅरोलची मुदत २१ मे ला संपली. २२ मे रोजी त्याला नागपूर कारागृहात हजर व्हायचे होते. दरम्यान त्याने आईची प्रकृती खराब असल्यामुळे पॅरोलची मुदत वाढविण्यासाठी नागपूर विभागीय आयुक्तांकडे अर्ज केला.

विभागीय आयुक्तांनी त्याचा अर्ज फेटाळून लावल्याने त्याच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल करण्यासाठी संरक्षण मागितले. उन्हाळी सुटीकाळातील न्या. एम. एल. टहलियानी गवळीची बाजू ऐकून त्याला याचिका दाखल करण्यासाठी २६ मे पर्यंतच्या मुदतीसह आणि संरक्षण दिले.
बातम्या आणखी आहेत...