आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा हजार मोजा अन् केजरींच्या पंगतीत बसा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- निवडणुकीच्या निधी संकलनासाठी ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल हे नागपुरात डिनर डिप्लोमसी राबवणार आहेत. दहा हजार रुपये व त्याहून अधिक निधी पक्षाला देणार्‍या दात्यांना हॉटेलात त्यांच्यासोबत डिनर व चर्चा करण्याची संधी मिळणार आहे.

केजरीवाल 13 आणि 14 मार्चला विदर्भाच्या दौर्‍यावर येत आहेत. 13 मार्च रोजी ते चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये स्थानिक उमेदवारांसाठी प्रचार सभा घेणार आहेत. त्याच दिवशी रात्री 8.30 वाजता नागपुरातील एका तारांकित हॉटेलात आम आदमी पार्टीला निधी देणार्‍या दात्यांसाठी केजरीवाल यांच्या उपस्थितीत डिनर व चर्चा ठेवण्यात आली आहे. दहा हजार रुपये अथवा त्यापेक्षा जास्त निधी देणार्‍या दात्यांना हे आमंत्रण राहणार असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे.