आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arvind Kejriwal News In Marathi, AAP, Maharashtra, Divya Marathi, Nagpur

अरविंद केजरीवाल 12 मार्चपासून महाराष्‍ट्राच्या दौ-यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - आपचे नेते अरविंद केजरीवाल 14 मार्चला नागपुरात येणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 मार्चपासून केजरीवाल महाराष्ट्राच्या दौ-यावर आहेत. त्यात 14 मार्च रोजी त्यांचा नागपूर दौरा ठरला आहे. नागपुरात त्यांचा रोड शो अथवा सभा घेण्याची आपची योजना आहे.

दरम्यान, अल्पसंख्याक मतदारांना साद घालण्यासाठी भाजपने शनिवारी नागपुरात अल्पसंख्यक संमेलनाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी माजी केंद्रीय मंत्री शहानवाज हुसेन व राज्यसभेच्या माजीअध्यक्षा नजमा हेपतुल्ला संमेलनास हजेरी लावणार आहेत.