आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागपूर येथील आसाराम बापूंच्या आश्रमाची तोडफोड, एकाला अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- कळमेश्वरजवळ असलेल्या फेटरी येथील आसाराम बापूंच्या आश्रमाची काही अज्ञात तरुणांनी आज (बुधवार) तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० ते ४० तरुणांनी आज दुपारी १ च्या सुमारास फेटरी येथील आसाराम बापूंच्या आश्रमातील कार्यालयाची तोडफोड केली. त्यानंतर जोरदार नारेबाजी करीत तरुण निघून गेले. हे तरुण भिमसेना या संस्थेचे असल्याचे समजते. त्यातील एका तरुणाला अटक करण्यात आली असून त्याचे नाव स्वप्निल गजभिये असल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी आश्रमाच्या व्यवस्थापकांनी कळमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

नागपुरातील शीख समुदायातही आहे आसाराम बापूंविरोधी लाट... वाचा पुढील स्लाईड्समध्ये