आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asaram Bapu Wasted Water In Nagpur Amid Drought In Maharashtra

दुष्‍काळग्रस्‍तांची चेष्‍टाः आसाराम बापुंची धुळवड, लाखो लिटर पाण्‍याची उधळपट्टी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्‍ट्र ही संतांची भूमि आहे. संतांनी जनतेच्‍या हितासाठी मोठा त्‍याग केला. परंतु, याच संतांच्‍या भूमित आधुनिक संतांनी मात्र या भूमिची प्रतिष्‍ठा धुळीस मिळविली. महाराष्‍ट्रातील जनता जीवघेण्‍या दुष्‍काळाच्‍या संकटात असताना स्‍वतःला संत म्‍हणवून घेणारे आसाराम बापू यांनी धुळवड साजरी केली. त्‍यात लाखो लिटर पाण्‍याची नासाडी करण्‍यात आली.

नागपूरच्या कस्तुरचंद पार्क मैदानावर आसाराम बापुंनी त्यांच्या हजारो भक्तांवर पाण्याचे फवारे उडवून धुळवड साजरी केली. यासाठी नागपूर महानगरपालिकेने पाण्‍याचे टँकर पुरविले होते. महत्वाचे म्हणजे, राज्यातील दुष्काळी परिस्थितीची जाणीव असतानाही आणि नागपुरात देखील उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असले तरीही भक्तांपैकी एकानेही त्यांचा विरोध केला नाही.

याप्रकरणी नागपूर महापालिकेने आयोजकांना नोटीस बजावली आहे.