आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Athawale Demands Creation Of Vidarbha, Vows Protests

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तेलंगणासोबत वेगळा विदर्भ द्या : आठवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - तेलंगणाच्या विधेयकात विदर्भ निर्मितीचा प्रस्ताव जोडावा, अशी मागणी रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी रविवारी केली. रिपाइंतर्फे आयोजित विभागीय मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.

वेगळय़ा विदर्भाच्या मुद्यावर आठवले म्हणाले की, सध्या तेलंगणाचे आंदोलन चांगलेच पेटले आहे. त्यासोबत स्वतंत्र विदर्भाचे आंदोलन पेटले तर मागणी मान्य होऊ शकते. मात्र वेगळय़ा विदर्भाच्या मुद्यावर निवडणुका जिंकता येत नाही. मागील विधानसभा निवडणुकीत हे स्पष्ट झाले आहे. या मागणीला जनतेचा पाठिंबा नाही असे वाटत असेल तर त्यावर सार्वमत घ्यायला हरकत नाही. विदर्भ संयुक्त कृती समितीतर्फे 21 रोजी अमरावती येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे ते म्हणाले.