आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील एटीएम झाले ‘हाउसफुल्ल’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - दिवाळीनिमित्त बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत असताना शहरातील एटीएममधून पैसे काढण्यासाठीही झुंबड उडाली आहे.


शुक्रवारी धनत्रयोदशी, शनिवारी नरक चतुर्दशी आणि रविवारी लक्ष्मीपूजन असे सलग तीन दिवस दिवाळी सणाचे आल्याने पैसे काढणे आणि खरेदी करण्याचा सपाटा नागरिकांनी सुरू केला आहे. शहरातील अनेक एटीएममधील रोकड संपल्याने उपलब्ध कोणत्याही बँकेच्या एटीएमवर सध्या ग्राहक गर्दी करीत आहेत. गुरुवारी सकाळपासूनच एटीएमवर रांगा लागल्याचे चित्र होते, तर बँकांच्या कार्यालयांमध्येही पैसे काढण्यासाठी ग्राहकांनी रांगा लावल्या होत्या. गुरुवारी दुपारी तीननंतर सर्वच एटीएमवर गर्दी अचानक वाढली. दिवाळीच्या तीनही दिवसांत पैसे काढणार्‍यांची संख्या वाढतच जाणार असल्याने बँकानीही एटीएममध्ये तत्काळ रोकड जमा करण्यासाठी मनुष्यबळ तैनात केले आहे. काही एटीएममधील पैसे संपल्याने ग्राहकांना दुसर्‍या मशीनमध्ये पैसे काढण्यासाठी जावे लागले.